Nikhil Katti : संकेश्वर नगरपालिकेत टाऊन प्लॅनिंगचे नियम 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार - निखील कत्ती

Sankeshwar Town Municipal Council : आपसी शेती, बिगरशेती (एनए) करावयाची आहे, त्यांनी आपला अर्ज नगरपालिकेला ३१ डिसेंबरच्या आत सादर करावा.
nikhil katti says sankeshwar municipality town planning rules implemented from 1 january 2025
nikhil katti says sankeshwar municipality town planning rules implemented from 1 january 2025Sakal

संकेश्वर : दोन वर्षापूर्वी शहराची वाढती लोकसंख्या व भौगोलिक परिसराचा विचार करुन शहराची तीन विभागात रचना केली होती. त्यामध्ये जुने गाव, नवीन वस्ती व रिकामी जागा अशी रचना करुन शहराचा विकास करण्याचा निर्णय केला.

तोच आराखाडा आता टाऊन प्लॅनिगला नगरपालिकेने सादर केला आहे. त्यानुसार १ जानेवारी २०२५ पासून शहराला टाऊन प्लॅनिंगचे सर्व नियम लागू होणार असल्याची माहिती आमदार निखील कत्ती यांनी दिली. ते येथील नगरपालिकेत आयोजित विशेष सभेत बोलत होते.

कत्ती म्हणाले, ज्यांना आपसी शेती, बिगरशेती (एनए) करावयाची आहे, त्यांनी आपला अर्ज नगरपालिकेला ३१ डिसेंबरच्या आत सादर करावा. घरफाळा, पाणीपट्टी थकीत आहे. शहराच्या विकासासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.

nikhil katti says sankeshwar municipality town planning rules implemented from 1 january 2025
BCB Recruitment Scam : कॅन्टोन्मेंट बोर्ड भरतीसाठी शेकडो अर्ज पण निवड मात्र २९ उमेदवारांचीच; CBIच्या पुढील भूमिकेकडे लक्ष

प्रभागाच्या नगरसेवकांनी प्रयत्न केल्यास फाळा वसूल होऊ शकतो, त्यातूनही विकासकामे करता येतात. पावसाळी हंगाम असल्याने डेंग्यु, कावीळ, थंडीताप आदी आजार डोके वर काढत आहेत. त्यासाठी परिसर स्वच्छता व औषध फवारणी करावी.

नागरिकांनीही खबरदारी घेऊन स्वच्छ पाणी उकळून प्यावे. प्राथमिक आरोग्य केंद्रातून याविषयी जागृती करावी. पालिकेतील रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्न करु. जुन्या महामार्गावर कालेज ते सोलापूर फाट्यापर्यंत रस्ता रुंदीकरणासाठी राज्यशासनाकडे पाठपुरावा सुरु आहे.

nikhil katti says sankeshwar municipality town planning rules implemented from 1 january 2025
Belgaum Corporation Recruitment : बेळगाव महापालिकेत लवकरच शंभर सफाई कामगारांची भरती; अशोक दुडगुंटी

माजी नगराध्यक्ष नगरसेवक अमर नलवडे, संजय शिरकोळी, सुनील पर्वतराव, श्रीकांत हतनुरे, अजित करजगी, विनोद नाईक यांनी चर्चेत सहभाग घेतला. मुख्याधिकारी प्रकाश मठद, अभियंते आर. बी. गडाद यांनी नगरसेवकांच्या प्रश्नाना समर्पक उत्तरे दिली. बैठकीस शिवानंद मुडशी, डाॅ. मंदार हावळ, विवेक क्वळ्ळी, श्रीकांत परीट, प्रशांत कोळी, कुमार कब्बुरी, चिदानंद कर्देन्नावर, रिजवाना रामपुरे, पार्वती नाईक यांच्यासह नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com