राष्ट्रवादीचे नऊ आमदार भाजपच्या संपर्कात; भाजप खासदाराचा दावा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकरांचा दावा 

मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा अजूनही कायम असतानाच राष्ट्रवादीचे नऊ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा माढ्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी आज (ता.13) केला आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पहाणी करण्यासाठी ते आज माढ्यात आले होते. त्यावेळी त्यांनी हा दावा केला आहे. त्याच्या दाव्यानंतर राज्यात घोडेबाजार सुरू होतो की काय अशीच शक्यता निर्माण झाली आहे.

INX Media : चिदंबरम यांना दिलासा नाहीच

दोन दिवसापूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादीची भूमिका भाजपचे सात आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट केले होते. अजित पवारांच्या या दाव्यावर आज खासदार निंबाळकरांचा विचारले असता भाजपचा एक आमदार पक्ष सोडून जाणार नाही उलट राष्ट्रवादीचे नऊ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केल्याने खळबळ उडाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nine NCP MLA Contact in BJP Says MP Ranjitsingh NImbalkar