INX Media : चिदंबरम यांना दिलासा नाहीच; कोठडीत पुन्हा वाढ

वृत्तसंस्था
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

आयएनएक्स मीडिया गैरव्यवहारप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत 27 नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया गैरव्यवहारप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत 27 नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश 'राउज एव्हेन्यू' न्यायालयाने दिले आहेत. दिल्लीतीळ राउज एव्हेन्यू न्यायालयासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने हे आदेश दिले.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

चिदंबरम यांना मागील सुनावणीदरम्यान आयएनएक्स मीडियाप्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्याची मुदत 13 नोव्हेंबर (आज) संपली. त्यानंतर आज पुन्हा एकदा सुनावणी घेण्यात आली. त्यासाठी चिदंबरम यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले. त्यानंतर आता न्यायालयाने चिदंबरम यांच्या कोठडीत पुन्हा एकदा वाढ केली आहे. 

राज्यपालांनी आम्हाला भरपूर वेळ दिला- शरद पवार

गेल्या सुनावणीदरम्यान चौकशीसाठी त्यांची आणखी एक दिवसाची कोठडी देण्याची मागणी ईडीने केली होती. मात्र, ही मागणी दिल्ली न्यायालयाने फेटाळून लावली होती.

चंद्रकांत दादांच्या शुभेच्छांमुळेच आम्ही आघाडीसोबत- उद्धव ठाकरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: INX Media case Delhi court extends P Chidambaram judicial Custody till 27 November