esakal | राष्ट्रवादीचे नऊ आमदार माझ्या संपर्कात : रणजितसिंह नाईक-निंबाळकर
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादीचे नऊ आमदार माझ्या  संपर्कात : रणजितसिंह नाईक-निंबाळकर

- मध्यावधी निवडणुका झाल्यास राष्ट्रवादीला उमेदवार मिळणार नाहीत 
- ईडीच्या नोटीसची पवारांनी मिळवली राजकीय सहानभुती 
- माढा मतदारसंघाच्या दौऱ्यात पत्रकारांशी संवाद 

राष्ट्रवादीचे नऊ आमदार माझ्या संपर्कात : रणजितसिंह नाईक-निंबाळकर

sakal_logo
By
अक्षय गुंड

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : राष्ट्रवादीचे नऊ आमदार माझ्या संपर्कात असून मध्यावधी निवडणुका लढवायची वेळ आल्यास त्यांना उमेदवारही मिळणार नाहीत, असे प्रतिपादन करत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी ईडीच्या नोटीसची राजकीय सहानभुती मिळवली असल्याचे मत भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी माढा येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. 

राज ठाकरेंचे युतीबाबतचे 'ते' कार्टून वास्तवात उतरलंय?

माढा येथे दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजपचे आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत, असे अजित पवार म्हणतायेत, असा प्रश्‍न पत्रकारांनी त्यांना विचारला तेव्हा ते म्हणाले, ""राष्ट्रवादीचे राज्यातील नऊ आमदार माझ्या संपर्कात आहेत. तसेच शरद पवारांना कोणतीही ईडीची नोटीस देण्यात आली नव्हती. पवारांना फक्त "शो' करून राजकीय सहानभुती मिळवण्यात यश आले. छत्रपती उदयनराजे भोसले यांना लवकरच राज्यसभेत अथवा राज्यात मोठे पद दिले जाणार असून त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी भाजप सकारात्मक आहे. तसेच माजी खासदार विजयसिंह मोहिते- पाटील यांना एप्रिल महिन्यात गोड बातमी मिळेल. जनतेचा कौल हा महायुतीला असून, शिवसेना- भाजप एकत्र येतील.

शरद पवारांनी आमदारांच्या रांगेत दिले 'त्यांना' स्थान; आमदारही भारावले!

पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी विधानसभा प्रचाराच्या वेळी प्रत्येक सभेत भाजपचा मुख्यमंत्री होणार असे सांगत होते. त्यावेळी शिवसेनेने आक्षेप घेतला नाही. परंतु निकाल लागताच मुख्यमंत्री पदासह 50- 50 असा दावा केला. खरे तर ते अन्य पदासाठी ठरले होते, मुख्यमंत्री पदासाठी नव्हते, असेही ते म्हणाले. राष्ट्रपती राजवट लागली हे प्रादेशिक पक्षांची जबाबदारी असून महायुतीला जनादेश मिळाला आहे. यास भाजप जबाबदार नाही.'' यावेळी शिवसेनेचे माढा विधानसभेच उमेदवार संजय कोकाटे, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजकुमार पाटील, करमाळा भाजप तालुकाध्यक्ष गणेश चिवटे उपस्थित होते. 

loading image
go to top