शरद पवारांनी आमदारांच्या रांगेत दिले 'त्यांना' स्थान; आमदारही भारावले

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 November 2019

आज वसंतदादा पाटील यांची जयंती असल्यामुळे त्यांच्या विधानभवन परिसरातील पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार विधान भवनात आले होते. त्यानंतर त्यांनी सभापतींकडे चहापान घेऊन पुढील आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी सर्व मंडळी रवाना झाली.

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आपल्या नवनिर्वाचित आमदारांसह विधानभवनात गेले होते. त्यावेळी त्यांनी तेथील सुरक्षा रक्षकाला आमदारांसोबत फोटोसाठी पहिल्या रांगेत थांबविल्याने त्यांच्याबद्दलचा आदर आमदारांत आणखीच वाढला. पवारांच्या या कृतीने आमदार भारावून गेले.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

आज वसंतदादा पाटील यांची जयंती असल्यामुळे त्यांच्या विधानभवन परिसरातील पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार विधान भवनात आले होते. त्यानंतर त्यांनी सभापतींकडे चहापान घेऊन पुढील आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी सर्व मंडळी रवाना झाली. यावेळी विधानभवनाबाहेर पडताना विधानभवनाच्या पायऱ्यांवर सदस्यांच्या आग्रहास्तव पवारांनी सर्वांसमवेत एक छायाचित्र काढले.

अजित पवारांना कोणते पद मिळणार? बारामतीकरांना उत्सुकता

छायाचित्र काढताना अचानक पवारांचे लक्ष तिथे कोपऱ्यात असणाऱ्या विधानभवनाच्या सुरक्षारक्षकाकडे गेले. तेव्हा त्यांनी सुरक्षा रक्षकाला बोलवून घेतलं. आणि पहिल्या रांगेत स्वतःसोबत फोटो काढला. साहेबांचे एवढे बारीक लक्ष आणि आपुलकी पाहून त्या कर्मचाऱ्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. तर, आमदारही त्यांची ही कृती पाहून भारावून गेले.

चर्चा योग्य दिशेने सुरु झाली : उद्धव ठाकरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP chief Sharad Pawar take photograph with newly elected MLAs