उभी पिके झाली आडवी : निपाणी, चिक्कोडी, हुक्केरी, अथणी, रायबागला दणका 

Nipani Chikodi Hukkeri Athani Raibag heavy rain in belgaum
Nipani Chikodi Hukkeri Athani Raibag heavy rain in belgaum

निपाणी (बेळगाव) : गतवर्षीप्रमाणे यंदाही अतिवृष्टी झाल्याने दोन महिन्यापूर्वी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याचा पंचनामा सुरू असतानाच परतीच्या पावसाने निपाणी, चिक्कोडी, हुक्केरी, अथणी, कागवाड, रायबाग तालुक्याला झोडपून काढले. त्यामध्ये जीवित हानी होण्यासह पीक आणि मालमत्तेचीही मोठे नुकसान झाले. हुक्केरी शहराला पावसाच्या पाण्याच्या मोठा फटका बसला आहे. चिक्कोडी उपविभागातील शेतकरी पावसाच्या दणक्याने चिंताग्रस्त बनले असून रब्बी हंगामातील त्याचा मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांचे डोळे शासनाच्या मदतीकडे लागले आहेत..;


दोन महिन्यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीकाठच्या भाजीपाल्यासह सोयाबीन, ऊस पिकाचे नुकसान झाले होते. कृषी खात्यातर्फे त्याचा सर्व्हे सुरू असतानाच चार दिवसापासून पुन्हा परतीच्या पावसाचा तडाखा बसला आहे. या पावसामुळे निपाणी, हुक्केरी, अथणी, चिक्कोडी, रायबाग, कागवाड तालुक्यातील अनेक गावांमधील घरांमध्ये पाणी शिरल्याने पडझड झाली. तर काही ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहने वाहून जाण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अनेकांना लाखो रुपयांचा फटका बसला.
गेल्या तीन-चार वर्षांमध्ये परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणावर पडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

चार दिवसांपूर्वी पडलेल्या पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला. त्यानंतर दररोज सकाळ, दुपार, सायंकाळ आणि रात्री पाऊस सुरूच असल्याने सर्व तालुक्यातील जनजीवन गारठले आहे. दसरा सण चार दिवसांवर येऊन ठेपला असतानाही मोठ्या शहरातील बाजारपेठेत ग्राहकच नसल्याने उद्योग-व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजारपेठेत उलाढाल पूर्णपणे ठप्प झाली आहे. लॉकडाउनच्या काळात व्यापाराअभावी अनेक व्यावसायिक अडचणीत सापडले होते. त्यानंतर आता परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांसह व्यापारीवर्गाला फटका बसत असून अर्थचक्र कोलमडले आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर बाजारपेठेतील उलाढाल वाढण्याची शक्यता असल्याने अनेक व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहेत. पण ग्राहक असल्याने व्यापारीही चिंताग्रस्त बनले आहेत.

हेही वाचा-परतीचा पाऊस शेतीच्या मुळावर : सांगलीत डाळिंब, द्राक्ष, केळीसह भाजीपाला पिकांचे नुकसान -

ऊस, द्राक्ष पिकाचे नुकसान
गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे कागवाड, अथणी तालुक्यातील द्राक्ष पिकासह अन्य तालुक्यातील ऊस व इतर पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे नुकसानभरपाईचा सर्व्हे करून भरपाई कधी मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


`तंबाखू आणि उस पिकात साचून राहिलेले पाणी शेतकऱयांनी बाहेर काढून द्यावे. जमिनीतील ओल कमी करण्यासाठी पाऊस थांबल्यानंतर पिकाला अमोनिया सल्फेट वापरल्यास पिकाला कोणतीही बाधा होणार नाही.`
-पुरुषोत्तम पिराजे, कृषी अधिकारी, निपाणी

विविध तालुक्यातील २४ तासात झालेला पाऊस
निपाणी-५१ मि. मी.
चिक्कोडी-५२ मि. मी.
हुक्केरी-९४ मि. मी.
अथणी-६३ मि. मी.
कागवाड-६४ मि. मी.
रायबाग-६७ मि. मी.


संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com