निपाणी : दरवाढीने बांधकामाचा डोलारा कोलमडला!

७० टक्के बांधकामे ठप्प : लोखंडाच्या दरात २५ ते ३० टक्के वाढ
Cement
Cementsakal
Updated on

निपाणी: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे लोखंडाने दरवाढीचा उच्चांक गाठला आहे. पंधरा दिवसात लोखंडाच्या दरात २५ ते ३० टक्के वाढ झाल्याने निपाणी भागातील बांधकाम व्यावसायिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. काही शासकीय कंत्राटदार व खासगी बांधकाम व्यावसायिकांनी कामच थांबविले आहे. निपाणी परिसरात जवळपास ७० टक्के कामे बंद केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

कोरोनानंतर रुळावर येऊ लागलेल्या बांधकाम व्यवसायात दरवाढीमुळे संक्रांत आली आहे. शासकीय कंत्राटदारांनी ४५ हजार रुपये टन या दराने बांधकाम करण्याचे शासकीय कंत्राट घेतलेले आहे. सिमेंटच्या दरापाठोपाठ आता लोखंडाच्या दरात २५ ते ३० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे एक टन लोखंडासाठी ७२ ते ७५ हजार रुपये मोजावे लागत आहेत. पर्यायाने बांधकामासाठी अधिकचा खर्च करावा लागणार आहे.

शासकीय प्रकल्पात कच्चामालाच्या किंमतीत वाढ झाल्यास १० ते १५ टक्के पर्यंत वाढीव रक्कम मिळते. ही दरवाढ त्यापेक्षाही अधिक असल्याने वाढलेले दर आणि बांधकामासाठी शासनाने आकारले दर यात ताळमेळ करणे कठीण झाले आहे. त्यामुळे ७० टक्के शासकीय कंत्राटदारांनी कामे थांबविलेली आहेत. लहान कंत्राटदारांना कच्चा मालाच्या किंमती वाढल्यास त्यांना त्याचा फायदा होत नसल्याने त्यांची अवस्था अधिकच बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बांधकाम व्यावसायिक अडचणीत

इंधन दरवाढ, बांधकाम साहित्यात झालेल्या दरवाढीमुळे बांधकाम व्यावसायिक अडचणीत सापडलेले आहे. त्यामुळे शहरातीलच नव्हे तर तालुक्यातील ७० टक्के बांधकाम व्यावसायिकांनी आपली कामे थांबविलेली आहेत. ते कच्चा मालाचे दर कमी होण्याची वाट पाहत आहेत. 'लोखंडाच्या भावात वाढ झालेली आहे. सिमेंटचे दरही वाढलेले आहेत. कामे घेतली तेंव्हा ४५ हजार रुपये टन लोखंड होते. आता लोखंडाच्या दरात २५ ते ३० टक्के तर सिमेंट, रंगाच्या दरातही १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांचे कंबरडे मोडले असून दर कमी होण्याची गरज आहे.'

-संजय सुतार,बांधकाम व्यावसायिक, निपाणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Latest Koyna Dam storage report
MD Drugs Replace Gang Rivalries: Organized Crime Network Tightens Grip in Western Maharashtra
Anjali Vetal from Karad wins bronze medal at U-15 Asian Wrestling Championship in Thailand
Wildlife rescuer trapped by rat snake
Marathi News Esakal
www.esakal.com