निपाणी : यंदा ज्वारी उत्पादनात घट

ज्वारीच्या कणसांची सुरु असलेली खुडणी
ज्वारी कापणी, कणसे खुडणी, मळणीची कामे अंतिम टप्प्यात आली
ज्वारी कापणी, कणसे खुडणी, मळणीची कामे अंतिम टप्प्यात आलीsakal
Updated on

निपाणी: निपाणी तालुक्यात सध्या ज्वारी कापणी, कणसे खुडणी, मळणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. यंदा ज्वारी उत्पादनात घट झाली आहे. मध्यंतरी ज्वारी उत्पादक शेतकरी मजुरांच्या टंचाईमुळे अडचणीत सापडले होते. मात्र पोषक वातावरणाचा लाभ घेत ही कामे पूर्णत्वाला आली आहेत.

खुडणीसाठी मजुरांचा ओढा वाढत आहे. खुडणीच्या मोबदल्यात ज्वारी दिली जात आहे. त्यामुळे मजूर खुडणीसाठी येत आहेत. काही ठिकाणी पैरा खुडणीसाठी पद्धतीचा अवलंब केला आहे. निपाणी तालुक्यात यंदा 1 हजार 180 हेक्टरमध्ये ज्वारीचे पीक घेतले आहे. पोषक वातावरणामुळे हे पीक चांगले साधले आहे. दाणेभरणीही चांगली झाली आहे. मात्र यंदा उत्पादनात घट झाली आहे. एकरी 500 ते 700 किलो ज्वारीचे उत्पादन निघत आहे. कडाक्याचे उन्ह असल्याने खुडणीसाठी मजूर सकाळी 7 ते 12 सायंकाळी 4 ते 6 यावेळेत येत आहेत. निपाणी तालुक्यात कोरडवाहू, बागायती अशा दोन्ही पध्दतीने दरवर्षी ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. जनावरांसाठी चारा, खाण्यासाठी म्हणून ज्वारी घेतली जाते. वेदगंगा, दूधगंगा नद्यांना बारमाही पाणी असल्याने शेतकऱ्यांनी ऊस, तंबाखूनंतर ज्वारीची पेरणी केली. खुडणीसाठी पोषक वातावरण असल्याने दोन दिवसात मळणीही उरकली जात आहे.

भविष्यात दर वाढण्याची शक्यता

यंदा ज्वारी पिकाच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे भविष्यात ज्वारीचा तुटवडा भासल्यास बाजारात दर वाढण्याची शक्यता आहे.

`पोषक वातावरणामुळे यंदा ज्वारीचे चांगले पीक आले होते. पण तांत्रिक कारणांमुळे उत्पादन घटले आहे. सध्या खुडणीची कामे सुरु झाली आहेत. त्या कामात शेतकरी गुंतले आहेत.`

पुरुषोत्तम पिराजे,कृषी अधिकारी, निपाणी

`यंदा काही प्रमाणात ज्वारी उत्पादनात घट झाल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. बाजारात ज्वारीचे दरही तेजीत आहेत. सध्या खुडणीची कामे सुरु असून उन्हाची तीव्रता जास्त असल्याने त्याची मळणीही केली जात आहे.`

एल. बी. खोत,शेतकरी, जत्राट.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Sugar Market
Guhagar Vijapur highway latest update
Shaktipeeth Highway Protes
Sangram Jagtap statement on Kesarekar murder
Marathi News Esakal
www.esakal.com