निपाणी : ‘रोहयो’मध्ये कामगार वाढीसाठी जागृती

राज्य शासनाकडून ग्रामीण भागात अकुशल व्यक्तींसाठी रोहयो योजना राबवली असून त्या अंतर्गत ग्रामविकासासाठी आवश्यक कामे करता येतात.
Kayaka Mitra
Kayaka MitraSakal
Summary

राज्य शासनाकडून ग्रामीण भागात अकुशल व्यक्तींसाठी रोहयो योजना राबवली असून त्या अंतर्गत ग्रामविकासासाठी आवश्यक कामे करता येतात.

निपाणी - चिक्कोडीपासून निपाणी तालुका विभागल्यावर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (रोहयो) (Employment Guarantee Scheme) योजनेंतर्गत कामगारांचा (Worker) सहभाग घटला आहे. परिणामी आता तालुका पंचायत प्रशासनाकडून निपाणी तालुक्यात गावागावात जागृती मोहीम (Awareness Campaign) राबविली जाणार आहे. त्यासाठी खात्याने जाहिरात फलकासह एक वाहन कार्यान्वीत केले आहे. जागृती कार्यात भाषेची अडचण येत असल्याने अधिकारी, कर्मचारयांची कोंडी झाली आहे.

राज्य शासनाकडून ग्रामीण भागात अकुशल व्यक्तींसाठी रोहयो योजना राबवली असून त्या अंतर्गत ग्रामविकासासाठी आवश्यक कामे करता येतात. प्रामु्ख्याने योजनेंतर्गत सहभागी कामगारांनी स्वतः काम करायचे असून त्यांना एक दिवस कामापोटी २८९ रुपये मजूरी दिली जाते. योजनेतून शासन १०० दिवस रोजगाराची हमी देऊन लागेल तेवढा निधी पुरविते, मात्र नियमात कामाची अंमलबजावणी बंधनकारक आहे. योजनेतून पेयजल, भू-जलाचे पुनर्भरण, मातीची धरणे, जल संधारण, पाणलोट विकास, चरी काढणे, बांध घालणे, सिंचन कालवे, नाले बांधणे, तलाव, गाळ उपसा, जलाशय नूतनीकरण, विहीर खोदणे, शेततळी, सिंचनासाठी आवश्यक मुलभूत सुविधा राबविणे अशी विविध कामे करता येतात.

यापूर्वी निपाणी तालुका चिक्कोडीत समाविष्ट होता, त्यावेळी योजनेंतर्गत कामासाठी नागरिकांची प्रतिसाद होता. मात्र निपाणी तालुका विभागल्यावर कामगारांनी योजनेकडे पाठ फिरवली आहे. निपाणी भागातील बहुसंख्य तरूण नजिकच्या महाराष्ट्र औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) कामावर जातात. पण तरुणांसह महिलांनी रोहयोमध्ये सहभागी झाल्यास चांगला मोबदला मिळू शकतो, असे खात्याच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Kayaka Mitra
एक विवाह ऐसा भीं; तीन फुटाचा वर अन् साडेपाच फुटाची वधू

हंचिनाळमध्ये जागृती

दोन दिवसापूर्वी हंचिनाळ-केएस (ता. निपाणी) येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामवास्तव्य कार्यक्रम पार पडला. यावेळी तालुका पंचायत प्रशासनाकडून रोहयोबद्दल जागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी योजनेत कामगारांचा सहभाग वाढविण्याचे आवाहन केले.

निपाणी तालुक्यातील २७ ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात रोजगार हमी योजनेत कामगारांचा सहभाग वाढविण्यासाठी कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन उळागड्डी, एम. आर. कोतवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जागृती कार्यक्रम राबवित आहोत. हंचिनाळमध्ये कार्यक्रम घेतला आहे. योजना अकुशल व्यक्तींसाठी लाभदायी असून जास्तीतजास्त लोकांनी सहभागी व्हावे.

येत्या काळात गावोगावी फिरून जागृती करणार आहोत.

- शशिकांत जोरे, आयईसी संयोजक.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com