परिवहनचा महत्वपू्र्ण निर्णय : कर्नाटकातून महाराष्ट्रात बससेवा सुरु

निपाणी-इचलकरंजी बससेवा सुरु; प्रवाशांतून समाधान
maharashtra karnataka bus service start from today parivahan mandal trained for four day in beigum
maharashtra karnataka bus service start from today parivahan mandal trained for four day in beigumEsakal

निपाणी : तब्बल दोन महिन्यापासून बंद असलेली निपाणी-इचलकरंजी (Nipani-Ichalkaranji)बससेवा गुरुवारी (ता. 9) पासून पुन्हा सुरु झाली आहे. त्यामुळे प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे. निपाणी आगाराने निपाणी स्थानकातून 2 ते बोरगाव स्थानकातून 1 बस इचलकरंजीला सुरु केली आहे. निपाणीतून जाणारी बस दिवसाकाठी 4 तर बोरगाव येथून इचलकरंजीला जाणारी बस 6 फेऱ्या मारत आहे. त्यामुळे प्रवाशांची सोय झाली असून आगाराला चांगले उत्पन्न मिळत आहे. निपाणी आगाराला जादा उत्पन्न मिळवून देणारा हा मार्ग असल्यामुळे या मार्गावर सातत्याने बससेवा सुरु असते.

निपाणी-इचलकरंजी (Nipani-Ichalkaranji) मार्गावर लखनापूर, अक्कोळ, गळतगा, भीमापूरवाडी, बेडकिहाळ, बोरगाव, बोरगाववाडीसह परिसरातील खेड्यातील प्रवाशी व विद्यार्थ्यांची ये-जा सुरु असते. ही बससेवा सुरु झाल्याने त्यांना आधार मिळाला आहे. कोरोना, महापूर, अतिवृष्टीमुळे ही बससेवा सुरु करण्यात परिवहन महामंडळाला अडचणी येत होत्या. मध्यंतरी महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांचा संप सुरु झाल्याने इचलकरंजीबाहेरच या बसेस थांबू लागल्या. आता या बसेस इचलकरंजी बसस्थानकापर्यंत जात असल्याने प्रवाशांची सोय झाली आहे. (Nipani-Ichalkaranji bus service started)

maharashtra karnataka bus service start from today parivahan mandal trained for four day in beigum
कोल्हापुरात पुन्हा आला गवा, सांगू कुठं?, औद्योगिक वसाहतीत भावा!

निपाणी-हुपरीही बससेवा सुरु

कोरोना, महापूर, अतिवृष्टीमुळे दोन वर्षापासून बंद असलेली निपाणी-हुपरी ही बससेवाही निपाणी आगाराने सुरु केली आहे. पूर्वी ही बस मांगूरपर्यंत धावत होती. तेथून पुढे प्रवाशांना खासगी वडापचा आधार घ्यावा लागत होता. आता ही बस हुपरी स्थानकापर्यंत जात आहे. निपाणी आगारातून 4 बसेस या मार्गावर असून दिवसाकाठी 12 फेऱ्या मारत आहेत. त्यामुळे या मार्गावरही चांगले उत्पन्न मिळत आहे.

`प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाने निपाणी-इचलकरंजी, निपाणी-हुपरी या मार्गावर बस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. वातावरण व प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन आणखी बसफेऱ्या वाढविण्याचा विचार सुरु आहे.`

-व्ही. एम. शशीधर, विभागीय नियंत्रणाधिकारी, चिक्कोडी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com