निपाणी : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निपाणी (Nipani) भेटीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याने मंगळवारी (ता. १५) येथील म्युनिसिपल हायस्कूल (Municipal High School) मैदानावर दुपारी ४ वाजता शताब्दी कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमास केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान (Chirag Paswan) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. सर्वसमावेशक होणारा शताब्दी कार्यक्रम यशस्वी करण्याचा निर्धार शुक्रवारी (ता. ११) सायंकाळी झालेल्या पूर्व तयारी सभेत कार्यकर्त्यांनी केला.