
मागील आठ दिवसात भागात जवळपास 33.0 अंश सेल्सिअस कमाल तर 7.5 ते 14.5 अंश सेल्सिअस किमान असे सरासरी तापमान राहिले आहे
निपाणी - निपाणी परिसरात मागील काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले असून तापमानात घट होत आहे. शनिवारी (ता. 28) तर पहाटेपासून पडलेले दाट धुके सकाळी उशीरापर्यंत होते. शिवाय दिवसभर हवेत थंडी होती. यामुळे नागरिकांना स्वेटर, जॅकॅटसह उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागला.
कृषी संशोधन केंद्रातील माहितीनुसार निपाणीचा आजचा पारा अवघ्या 14 अंशावर आल्याने दिवसभर थंडीने शहर गारठले होते.
मागील आठ दिवसात भागात जवळपास 33.0 अंश सेल्सिअस कमाल तर 7.5 ते 14.5 अंश सेल्सिअस किमान असे सरासरी तापमान राहिले आहे. चार दिवसांपूर्वी भागात अधून-मधून ढगाळ वातावरण होते. दिवाळीपूर्वी चार दिवस थंडी जाणवत होती. त्यानंतर आठ दिवसात तापमानात चढ-उतार जाणवला. सध्या दिवसभर 30 ते 33 अंश सेल्सिअस एवढे तापमान असते. कमी-अधिक प्रमाणात धुक्याचेही प्रमाण आहे.
21, 23, 24 नोव्हेंबरला 31 ते 33 अंश सेल्सिअस एवढ्या उच्च तापमानाची नोंद आहे. तर 22, 25 व 26 नोव्हेंबर या तीन दिवशी 13.0, 11.0 व 11.5 अंश सेल्सिअस एवढ्या सर्वात किमान तापमानाची नोंद झाली आहे. परिसरात रब्बी हंगामातील शाळू, हरभरा व गव्हाची पेरणी झाली आहे. त्याची उगवण होत असतानाच व आंतरमशागतीच्या कामावेळी तीव्र थंडी पडत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस तापमान घटत जाईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
21 ते 28 नोव्हेंबर अखेरचे तापमान (अंश सेल्सिअस)
तारीख कमाल किमान
21 33 14
22*32*13
23*32*13.5
24*33*14
25*30*11
26*30.5*11.5
27*29*14.5
28*31*14
11 नोव्हेंबरला निच्चांकी तापमान
कृषी संशोधन केंद्रातील माहितीनुसार यंदा हिंवाळा सुरु झाल्यापासून 11 नोव्हेंबरला सर्वाधिक निच्चांकी तापमान राहिले. तेथील नोंदीनुसार या दिवशी कमाल 29 तर किमान 7.5 अंश सेल्सिअस एवढे तापमान होते.
संपादन - धनाजी सुर्वे