esakal | निपाणी : सततच्या पावसाने पिकांचे पानिपत !
sakal

बोलून बातमी शोधा

Paschim maharashtra

निपाणी : सततच्या पावसाने पिकांचे पानिपत !

sakal_logo
By
- राजेंद्र हजारे

निपाणी : निपाणी (Nipani) तालुक्यात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक पाण्यात गेले आहे. उभा ऊसही आडवा झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यातच काढणीला आलेल्या सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटून दाणे बाहेर पडत असल्याने ते हतबल झाले आहेत. मुसळधार पावसाने नाले, ओहोळी तुडूंब भरून वाहिल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतीत पाणी घुसले आहे.

सद्यःस्थितीत १२० एकर सोयाबीनच्या उभ्या पिकाच्या शेंगाना कोंब फुटले आहेत. सोयाबीनच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी बियाणे, खते, पेरणी, खुरपणीसाठी जास्त खर्च केला होता. यातून चांगले उत्पन्न अपेक्षित होते. परंतु पावसामुळे शेतात पाणी साचून सोयाबीन जागेवरच काळे पडत आहे. हिरव्या शेंगांमधून कोंब बाहेर येत असल्याने उत्पन्नात घट येऊन योग्य दरही मिळणे कठीण बनले आहे.

हेही वाचा: ‘ओ शेठ’ची लढाई थेट पोलिसांत; गाण्याच्या क्रेडिटवरून रंगला श्रेयवाद

पाणी ओसरलेल्या शेतातील सोयाबीन काढणीचे काम सुरू आहे. उर्वरित शेतात पाणी असल्याने नुकसान होत आहे. नदी, ओढ्याकाठच्या उसातही गुडघाभर पाणी थांबले आहे. वारा, पाणी वहात असल्याने ऊस आडवा झाला आहे. सततच्या पावसामुळे कांद्यात पाणी साचले आहे. त्यावर रोगाचा प्रादुर्भावही दिसत आहे. त्यामुळे आता औषध फवारणीचा खर्चही वाढणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. एकंदरीत सलग पडलेल्या पावसामुळे हातातोंडाशी आलेली पिके गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडणार आहे.

हेही वाचा: शेतातील लाइट लावताना शेतकऱ्याचा मृत्यू

उत्पादन कमी, तण जास्त

महिन्यापूर्वी झालेली अतिवृष्टी, सलग आठ दिवसाच्या पावसामुळे शेतात जास्त पाणी साचून आहे. त्याचा तंबाखू पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. सततच्या पाण्यामुळे सोयाबीन कुजले असून उत्पादनात घट येण्यासह तण वाढले आहे.

'झालेली अतिवृष्टी, आलेल्या पूरपरिस्थितीमुळे सोयाबीन व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचा सर्व्हे अंतिम टप्प्यात असून आता आठवडाभरापासून पडलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा सर्व्हेही केला जाईल.'

-पुरुषोत्तम पिराजे, कृषी अधिकारी, रयत संपर्क केंद्र, निपाणी

loading image
go to top