
-नीषा पाटील
सांगली : हुल्लडबाजांना पोलिसी खाक्या दाखवण्याचे काम निर्भया पथकाकडून केले जाते. महिला अत्याचार रोखण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली जाते. अल्पवयीन मुलांना कायद्याचा धाक दाखवून समुपदेशनही केले जाते. त्यातून जिल्ह्यात ३९९ हॉटस्पॉट असल्याची कागदोपत्री नोंद असून ‘निर्भया’चा या स्पॉटवर नेहमीच ‘वॉच’ असतो.