
सांगली : ‘‘उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्ह्यात मजबूत बांधणी सुरू होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी सुमारे सव्वा लाख सभासद नोंदणी करण्यात येईल. या निवडणुकीत पक्षाची ताकद दाखवून देऊ आणि सांगली जिल्हा पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनवू,’’ असा विश्वास पक्षाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला.