शेट्टींच्या प्रवृत्ती विरोधात संघर्ष करणार -  निवेदिता माने 

शेट्टींच्या प्रवृत्ती विरोधात संघर्ष करणार -  निवेदिता माने 

इचलकरंजी - हातकणंगले लोकसभा संघात शेट्टी यांचा ढोंगीपणा मोडून काढण्यासाठी यावेळी राजकीय शिवधनुष्य उचलण्याचा निर्णय धैर्यशिल माने यांनी घेतला आहे. मऊ लागेल तिथं उकरण्याची शेट्टी यांची प्रवृत्ती आहे या विरोधात संघर्ष करणार असून शेट्टी कसे निवडून येतात ते बघणारच आहे, असा इशारा  माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांनी दिला.

माजी खासदार निवेदिता माने इचलकरंजी बंद आंदोलनात सहभागी होण्यासाठी येथे आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यात त्यांनी आगामी राजकीय भूमिकेबाबत चर्चा केली.

माने म्हणाल्या, नेहमीच पक्षाचा आदेश मानला मात्र माने गटाला पक्षश्रेष्ठी गृहीत धरत आहेत. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीत धैर्यशिल माने राजकीय शिवधनुष्य उचलणार आहेत. हातकणंगले लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याचा असताना गतवेळी काँग्रेसला जागा सोडली. यावेळीही काँग्रेस - राष्ट्रवादीकडून खासदार शेट्टी यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरू आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरुवातीपासून माने गटाला सापत्नभावाची वागणूक दिली जात आहे. माने गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन मतं आजमावली असता संघर्ष करण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे धैर्यशिल माने यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. मात्र आयत्या पिठावर रेघोट्या ओढणारे आणि प्रत्येक गोष्टींचे मार्केटींग करण्याची सवय लागलेल्या खासदार शेट्टी यांचा ढोंगीपणा मोडून काढण्यासाठी यावेळी राजकीय शिवधनुष्य उचलण्याचा निर्णय धैर्यशिलने घेतला आहे.

यावेळी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, ताराराणी आघाडीचे नेते सागर चाळके उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com