
सांगली : यंदाच्या दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त व गैरप्रकारमुक्त घेण्याबरोबरच निकालाची गुणवत्ता वाढवण्यासाठी सर्व प्राचार्य व मुख्याध्यापकांसह परीक्षा संचलनातील सर्व अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे. बोर्डाच्या परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिला.