केंद्राच्या निकषामुळे लॉकडाऊन नाही 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 September 2020

केंद्र शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या अनलॉक नियमांतर्गत कोणत्याही राज्यातील जिल्ह्यात नव्याने लॉकडाऊन जाहिर करावयाचा असेल तर केंद्र सरकारची परवानगी गरजेची असेल, असे नमुद केले आहे. केंद्राने असे अधिकार राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. या नव्या नियमांमुळे पालकमंत्र्यांची इच्छा असूनही प्रशासनाला लॉकडाऊन ऐवजी जनता कर्फ्यूचा पर्यायाला प्राधान्य द्यावे लागल्याची चर्चा आहे. जनता कर्फ्यूबाबत लोक फार पुढाकार घेताना दिसत नाहीत. त्यामुळे वाढणाऱ्या सामाजिक प्रसाराला आळा कसा घालायचा असा प्रश्‍न जिल्ह्यासमोर भेडसावत आहे. 

सांगली ः केंद्र शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या अनलॉक नियमांतर्गत कोणत्याही राज्यातील जिल्ह्यात नव्याने लॉकडाऊन जाहिर करावयाचा असेल तर केंद्र सरकारची परवानगी गरजेची असेल, असे नमुद केले आहे. केंद्राने असे अधिकार राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. या नव्या नियमांमुळे पालकमंत्र्यांची इच्छा असूनही प्रशासनाला लॉकडाऊन ऐवजी जनता कर्फ्यूचा पर्यायाला प्राधान्य द्यावे लागल्याची चर्चा आहे. जनता कर्फ्यूबाबत लोक फार पुढाकार घेताना दिसत नाहीत. त्यामुळे वाढणाऱ्या सामाजिक प्रसाराला आळा कसा घालायचा असा प्रश्‍न जिल्ह्यासमोर भेडसावत आहे. 

माध्यमांशी बोलताना पालकमंत्री जयंत पाटील यांनी लॉकडाऊनचे सुतोवाच केले होते. त्यामुळे पुन्हा चर्चा सुरू झाली होती. जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून प्रतिदिन हजारावर कोरोना रुग्ण सापडत आहेत. या पार्श्‍वभूमीवर गेली आठवडाभर जिल्ह्यात लॉकडाऊनची चर्चा बरीच रंगली. पालकमंत्र्यांच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत जिल्ह्यात लॉकडाऊला फाटा देण्यात आला. याला पर्याय म्हणून जनता कर्फ्यू दिला असला तरी काही मोजकी गावे सोडली तर फारसा प्रतिसाद नाही. शहरांच्या बाबतीत मात्र इस्लामपूर, तासगाव, कडेगाव, विटा या शहरांतून जनता कर्फ्यूला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.

जिल्ह्यात 730 गावे असून यापैकी मोजक्‍याच 50 गावामध्ये जनता कर्फ्यू यशस्वी झाला आहे. लॉकडाऊनला काही लोकप्रतिनिधी आणि व्यावसायिकांचाही विरोधच आहे. कोरोनाला रोखण्याचे प्रशासनासमोरील आव्हान कायम आहे. 
पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी झालेल्या लोकप्रतिनिधी यांच्या बैठकीत कोरोना रुग्ण आणि उपाययोजनांवरच चर्चा झाली. लॉकडाऊनवर चर्चाच झाली नाही, असे सांगितले जाते. लोकप्रतिनिधींनी लॉकडाऊन कशासाठी, असे म्हणत त्याला विरोध केल्याचे चर्चा रंगली. यामुळे बैठकही लांबली. 

येथे आहे जनता कर्फ्यू.... 
जनता कर्फ्यू असलेली गावे : तासगाव तालुका- तासगाव शहर, मणेराजुरी. कडेगाव तालुका- कडेगाव शहर, वांगी. कवठेमहांकाळ तालुका- कवठेमहांकाळ शहर, हिंगणगाव, रांजणी. शिराळा तालुका- शिराळा शहर, कांदे, शिरसी, आरळा. वाळवा तालुका- इस्लामपूर शहर, कामेरी. मिरज तालुका- कवलापूर, बुधगाव, माधवनगर, कांचनपूर, तुंग, इनामधामणी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No lockdown due to center criteria