कार्यालयात गैरहजर राहिल्याने इचलकरंजी पालिकेच्या १६ कर्मचाऱ्यांना नोटीस | Ichalkaranji | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ichalkaranji   Municipality New President Preparation

कार्यालयात गैरहजर राहिल्याने इचलकरंजी पालिकेच्या १६ कर्मचाऱ्यांना नोटीस

इचलकरंजी - कार्यालयात वेळेत उपस्थीत नसणा-या तब्बल १६ पालिका अधिकारी व कर्मचा-यांना मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामध्ये गैरहजर असल्याबद्दल आपल्या वेतनात कपात का करु नये, अशी विचारणा करीत याबाबत २४ तासात खुलासा करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे कर्मचा-यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

पालिकेचे अनेक कर्मचारी कार्यालयात वेळेत उपस्थीत नसतात. याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. सकाळी ९.४५ ते ६.१५ अशी पालिकेच्या कार्यालयीन कामकाजाची वेळ आहे. पण या वेळेत अनेक कर्मचारी येत नाहीत. त्याबाबतची आज सकाळी मुख्याधिकारी ठेंगल, कामगार अधिकारी विजय राजापूरे व उपमुख्याधिकारी केतन गुजर यांनी पाहणी केली. सकाळी मुख्य दरवाजा बंद करीत सर्व विभागाची फिरती केली. यामध्ये तब्बल १६ अधिकारी व कर्मचारी उपस्थीत नसल्याचे निदर्शनास आले. यामध्ये अभियंते, लिपिक व शिपाई यांचा समावेश आहे.

हेही वाचा: लाकडी ओंडका डोक्यात घालून अवचितवाडीत ऊसतोडणी मजूराचा खून

या सर्वांची मुख्याधिकारी ठेंगल यांनी झाड़ाझड़ती घेतली. तसेच त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये आपण कार्यालयीन वेळेत गैरहजर असल्याचे निदर्शनास आल्यामुळे आपल्या वेतनातून कपात का करु नये, अशी विचारणा करीत याबाबत २४ तासात खुलासा करण्याचा आदेश दिला आहे. संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचा खुलासा आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी ठेंगल यांनी सांगितले. अचानक केलेल्या या फिरतीमुळे पालिका कर्मचा-यांमध्ये खळबळ उडाली होती.

loading image
go to top