बायोमेंथॅनेशन प्रकल्प संस्थेला नोटीस 

Notice to the Institute for Biomethanation Project
Notice to the Institute for Biomethanation Project

नगर : बुरुडगाव कचरा डेपोच्या बायोमेंथॅनेशन प्रकल्पाच्या ठेकेदाराला महापालिकेने नोटीस पाठविली आहे. गेल्या काही दिवसांपासून या ठेकेदाराने काम बंद केले आहे. 

बुरुडगाव कचरा डेपोमध्ये उभारण्यात येत असलेल्या बायोमेंथॅनेशन प्रकल्पाचे काम बंद आहे. ठेकेदार संस्थेने काम पूर्ण होण्यापूर्वीच देयक अदा करण्याची मागणी करीत काम बंद करण्याशिवाय पर्याय नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हा प्रकल्प अडचणीत सापडला आहे. या प्रकरणी महापालिकेने ठेकेदाराला कारवाईची नोटीसही बजावली आहे. 

राष्ट्रीय हरित लवादाने हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जानेवारीअखेरची मुदत दिली आहे. प्रकल्प मुदतीत होण्याची शक्‍यता सध्या धूसर झाली आहे. त्यामुळे पाच कोटींची बॅंक गॅरंटीही जप्त होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. हा प्रकल्प 26 डिसेंबरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र, आठपैकी केवळ दोन रिऍक्‍टर साइटवर उपलब्ध आहेत. फाउंडेशनचे कामही अर्धवट अवस्थेत आहे. असे असतानाही ठेकेदार संस्था देयक मागत आहे. त्यामुळे महापालिकेचे कर आयुक्‍त सुनील पवार यांनी ठेकेदार संस्थेला नोटीस बजावली आहे. 

शहरात अनेक ठिकाणी अजूनही घंटागाड्या पोचलेल्या नाहीत. त्यामुळे शहरात कचरा कोंडीची समस्या सुटलेली नाही. कचरा संकलनाचा ठेका दिल्यास शहर स्वच्छ होईल असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वी आमदार संग्राम जगताप यांना आश्‍वासन दिले होते. महापालिकेचे सफाई कामगारांकडून शहरात साफसफाई करण्याचे काम योग्य प्रकारे केले जात नसल्याच्या तक्रारी आहेत. शहरातील रस्त्यावरील कचरा हा कचरा कुंड्या अथवा महापालिकेच्या घंटागाड्यांत पोचत नाही. 

अन्यथा ठेकेदाराकडून दंड वसुली 
घंटागाड्यांनी वाहून आणलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी बुरुडगाव येथील कचरा डेपोत बायोमेंथॅनेशन प्रकल्प वेळेत सुरू करण्याचे निर्देश हरित लवादाने दिले आहेत. त्यासाठी 26 डिसेंबरपर्यंतची मुदत हरित लवादाने महापालिकेला दिलेली आहे. या प्रकल्पासंदर्भात हरित लवादाकडून दंड झाल्यास तो संबंधित ठेकेदाराकडून वसूल करण्यात येईल, असे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी संबंधित ठेकेदारांची बैठक घेऊन सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com