अहिल्यानगर येथील परिचारिका "कोरोना' पॉझिटिव्ह 

ऋषिकेश माने 
Wednesday, 29 July 2020

शहरातील एका खासगी रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये ती नर्स म्हणून कार्यरत होती.

कुपवाड (सांगली) : "कोरोना' संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर कुपवाड महापालिका प्रभाग एक अहिल्यानगर येथील 23 वर्षीय परिचारिकेचा अहवाल बुधवारी दुपारी पॉझिटिव्ह प्राप्त झाला. 

संबीधित युवती अहिल्यानगर बाजारपेठ परिसरात रहिवासी आहे. शहरातील एका खासगी रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये ती नर्स म्हणून कार्यरत होती. दक्षतेपोटी रुग्णालयातील वैद्यकीय पथकामार्फत डॉक्‍टर आणि कर्मचाऱ्यांची रॅपिड टेस्ट करण्यात आली. या चाचणीद्वारे युवतीचा बुधवारी दुपारी आलेला अहवाल हा पॉझिटिव्ह प्राप्त झाला. यामुळे अहिल्यानगर परिसरात खळबळ उडाली. 

महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजीवनी घाडगे यांच्यासह पथकाने तात्काळ धाव घेतली. रुग्णांच्या कुटुंबीयांची प्राथमिक तपासणी करून त्यांना पुढील तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.आवश्‍यकतेनुसार कंटेनमेंट झोन निश्‍चित करण्यात आला. आरोग्य विभागाने प्रतिबंधक यंत्रणा राबवली. वैद्यकीय पथकाने परिसराचा सर्व्हे सुरू केला. नागरिकांना दक्षतेचे आव्हान केले. रुग्णांच्या कौटुंबिक तपासणीनंतर पुढील दिशा ठरवण्यात येईल अशी माहिती डॉ. घाडगे यांनी दिली. 

संपादन ः शैलेश पेटकर 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nurse from Ahilyanagar "Corona 'positive