

A 73-year-old woman reunites with her family
sakal
सांगली : प्रशासनातील अधिकाऱ्यांनी निर्धार केल्याने बार्शी (जि. सोलापूर) येथील एका ७३ वर्षीय महिलेस दीड वर्षांनी आपल्या कुटुंबात परत जाण्याची संधी मिळाली. चुकून ओडिशा राज्यात गेलेली ही महिला सतर्क अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे आज आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनी आपल्या गावी परतली. विजयाबाई रघुनाथ जाधव असे या आजींचे नाव आहे.