देवराष्ट्रे येथील जन्मघर स्मारक रखडले

मुकुंद भट
शनिवार, 25 नोव्हेंबर 2017

ओगलेवाडी - भारताचे माजी उपपंतप्रधान व आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या देवराष्ट्रे (ता. कडेगाव, जि. सांगली) येथील जन्मघर स्मारक उभारणीचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. 

दरम्यान, देवराष्ट्रे व परिसराच्या विकासासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाच वर्षांपूर्वी जन्मशताब्दी वर्षात १५ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केला होता. त्यातील जन्मघर स्मारकासाठी मंजूर दोन कोटी १७ लाख निधीचा वापर न झाल्याने हा निधी परत जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

ओगलेवाडी - भारताचे माजी उपपंतप्रधान व आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या देवराष्ट्रे (ता. कडेगाव, जि. सांगली) येथील जन्मघर स्मारक उभारणीचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. 

दरम्यान, देवराष्ट्रे व परिसराच्या विकासासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाच वर्षांपूर्वी जन्मशताब्दी वर्षात १५ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केला होता. त्यातील जन्मघर स्मारकासाठी मंजूर दोन कोटी १७ लाख निधीचा वापर न झाल्याने हा निधी परत जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

यशवंतराव चव्हाणांच्या जन्मस्थानास राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा, केंद्र शासनाने त्यांना भारतरत्न किताब देऊन यथोचित सन्मान करावा, ताकारी प्रकल्पास त्यांचे नाव द्यावे, अशा तेथील लोकांच्या प्रमुख मागण्या आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाच्या निमित्ताने २५ नोव्हेंबर २०१२ रोजी देवराष्ट्रेस भेट दिलेली होती. देवराष्ट्रेकडे पर्यटक आकर्षित झाले पाहिजेत व गाव प्रेरणास्थळही बनण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. देवराष्ट्रे गावाच्या विकासाकरिता काही करू न शकल्याची खंत यशवंतरावांनी व्यक्त केल्याचा उल्लेख त्यांच्या आत्मचरित्रात आहे. त्यांची इच्छा पूर्ण करण्याचा निर्धार व सागरेश्वर अभयारण्याचा विकास वन्य खात्यामार्फत करण्याचे अश्वासन डॉ. पतंगराव कदम यांनी त्या वेळी दिले होते. सागरेश्वर अभयारण्यास ब वर्ग दर्जा देण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. 

यशवंतराव चव्हाण ग्रामप्रबोधिनीचे अध्यक्ष दत्तात्रय सपकाळ यांनी सांगितले, की यशवंतराव चव्हाण यांचे जन्मगाव म्हणून देवराष्ट्रेची ख्याती देशाच्या नकाशावर पोचली; पण तेथील लोकांना अद्याप अनेक नागरी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सातारा जिल्ह्याच्या टोकावरील डोंगर कुशीत वसलेल्या देवराष्ट्रेचे सागरोबा दैवत आहे. यशवंतरावांची बालपणाची जडणघडण तेथे झाली. त्यांचे या गावावर विलक्षण प्रेम व जिव्हाळा होता. त्यांचे शिक्षण झालेली प्राथमिक शाळा, एसटी स्टॅंडची सुधारणा, उद्यान उभारणे, सागरेश्वर व महादेव मंदिर परिसर सुधारणा या विकासकामांवर शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.’’

जन्मघराचे ठिकाण सांस्कृतिक कार्य व क्रीडा विभागाच्या वतीने आठ फेब्रुवारी २००१ रोजी ऐतिहासिक स्मारक म्हणून घोषित करण्यात आले. स्मारकाचा ताबा पुरातत्व विभागाकडे व देखभाल प्रतिष्ठानकडे आहे. पुरातत्व विभागाने मोडकळीस आलेल्या चव्हाणांच्या जन्मघराची ६५ हजार रुपये खर्च करून दुरुस्ती केली आहे. नंतर शासनाने याठिकाणी बांधकाम करून पूर्वीच्या जन्मघरास उर्जितावस्था प्रात करून दिल्याचे व्यवस्थापक प्रदीप मोहिते यांनी सांगितले.

मुलींसाठी तंत्रज्ञान शिक्षण सोय करा
यशवंतराव चव्हाण विद्यालय व कनिष्ठ महावद्यालयात (कै.) यशंतरावराव चव्हाण यांच्या आईनंतर त्यांच्या जीवनाला आकार आणि आशय देणाऱ्या वेणूताईंच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुलींच्यासाठी तंत्रज्ञान शिक्षणाची सोय करावी. सांस्कृतिक सभागृह सर्वांसाठी खुले व्हावे. बंद ग्रंथालयाचा वापर सुरू करावा, अशी लोकांची मागणी आहे, असे प्राचार्य काशिनाथ पवार, सहायक 
शिक्षक प्रमोद मोरे (देवराष्ट्रे) यांनी सांगितले.

Web Title: ogalewadi satara news yashwantrao chavan birth home monument