दारूड्या मुलाने केला वृद्ध वडिलांचा खून 

Old father murdered by drunken boy
Old father murdered by drunken boy
Updated on

संगमनेर : घरात असलेला सुमारे सात ते आठ क्विंटल कापूस विकण्यास पत्नी आणि वडिलांनी विरोध केल्याने, दारुड्या मुलाने वयोवृद्ध वडिलांना मारहाण करीत दगडावर डोके आपटून त्यांचा खून केला. तालुक्‍यातील आश्वी बुद्रुक येथे आज पहाटे अडीचच्या सुमारास ही घटना घडली. सोन्याबापू किसन वाकचौरे (वय 70), असे मृताचे नाव आहे. अलका संतोष वाकचौरे (वय 36) हिने दिलेल्या फिर्यादीवरून आश्‍वी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करून, आरोपी संतोष वाकचौरे याला अटक केली आहे. 

आरोपी संतोषचा पहिल्या पत्नीशी घटस्फोट होऊन, अलकाशी दुसरे लग्न झाले आहे. त्यांना दोन मुली आहेत. त्याला दारूचे व्यसन असल्याने, त्याचे घरात नेहमी खटके उडत असत. गेल्या तीन दिवसांपासून तो बाहेर जेवण करून घराबाहेर झोपत असे. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्याने घरातील कापूस विकणार असल्याचे सांगितले. त्याला विरोध केल्याने त्याने कापूस पेटवून देण्याची धमकी देत पत्नी व वडिलांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. 

मध्यरात्री दोनच्या सुमारास दरवाजा उघडायला भाग पाडून त्याने पुन्हा कापूस पेटविण्याचा प्रयत्न केला. त्याला समजावण्यासाठी गेलेल्या वडिलांशी झटापट करीत, घराबाहेरील दगडावर त्यांचे डोके आपटले. अलका यांनी कळविल्यानंतर त्यांचा भाचा नवनाथ दळे मांडवे (ता. श्रीरामपूर) येथून पहाटे साडेतीनच्या सुमारास आला. त्याच्या मदतीने गंभीर जखमी सोन्याबापू यांना लोणीच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jayant Patil BJP Entry sangli politics
Kavthemahankal youth missing canal accident
Miraj Kolhapur Jalna ST bus attack latest news
sparrow chick falls from nest
Marathi News Esakal
www.esakal.com