कोरोना इफेक्ट : रोज दीड जीबी डाटा पुरेना

सकाळ वृत्तसेवा
Friday, 24 April 2020

एका महिन्यात लोकांनी स्वतःला घरात कोंडून घेतलेय. लोक कंटाळलेत. मात्र काही ना काही व्याप करून "टाईम पास' व्हावा, यासाठी धडपड सुरु आहे. त्यात कामी येतोय तो स्मार्ट फोन आणि रोजचा दीड जीबी डाटा. तोही पुरत नसल्याची तक्रार सुरु झाली आहे.

सांगली : एका महिन्यात लोकांनी स्वतःला घरात कोंडून घेतलेय. लोक कंटाळलेत. मात्र काही ना काही व्याप करून "टाईम पास' व्हावा, यासाठी धडपड सुरु आहे. त्यात कामी येतोय तो स्मार्ट फोन आणि रोजचा दीड जीबी डाटा. तोही पुरत नसल्याची तक्रार सुरु झाली आहे.

जगभरातच या काळात फेसबूक, वॉटस्‌ऍपसह टिकटॉक, एमएक्‍स प्लेअर, नेटफ्लिक्‍स, हॉटस्टारसह समाज माध्यमांचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. ऑनलाईन बॅंकिंग आहे, त्यांचे रिचार्ज सोपे झाले. मात्र रिचार्ज सेंटरवर विसंबून असणाऱ्यांची पंचाईत होत आहे. 

चीनमुळे कोरोना आला आणि त्यांची अद्दल घडवण्यासाठी आता चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला, असे आवाहन काही करत आहेत. त्याचवेळी चीनची निर्मिती असलेल्या टिकटॉकने भारतीय "घरे' व्यापून टाकली आहेत. फेसबूकवर या काळात अनेक भन्नाट ट्रेंड सुरु झालेत. "जुने फोटो' अपलोड करण्याचा ट्रेंड जोरात आहे. लोकांनी अल्बमच्या अल्बम रिकामे केलेत. "छोटीसी प्रेम कथा' ही हॅशटॅग गाजला. महिलांनी यू-ट्यूबच्या माध्यमातून रेसिपी शिकण्या, शिकवण्यावर भर दिला. साहजिकच, त्याचे व्हिडिओ करून पुन्हा ते वॉटस्‌ऍप आणि फेसबूकवर शेअर केले गेले. 

सहाजिकच, रोजचा इंटरनेटचा वापर प्रचंड वाढला. सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत इंटरनेटचा वेग मंदावतो, त्यामागे या काळात सर्वाधिक लोक ऑनलाईन असतात, असा निष्कर्ष समोर आला. दुपारी "वामकुक्षी' घेण्याचे प्रमाण वाढल्याने या काळात इंटरनेट वेगाने धावताना दिसते. सध्या नव्या मोबाईल कार्डची विक्री, अपडेट करणे आदी सारे थांबले आहे. 

सोशल साईट आणि जगातील युजर्स (जानेवारी 2020)

  • यू-ट्यूब ः 2000 मिलियन 
  • वॉटस्‌अप ः 1600 मिलियन 
  • एफबी मॅसेंटर ः 1300 मिलियन 
  • इन्साग्राम ः 1000 मिलियन 
  • ट्‌विटर ः 340 मिलियन 

रिचार्ज सेंटर सुरु करा 
काही मोबाईल कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मोबाईल रिचार्ज सेंटर सुरु करण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी केली आहे. किमान शहरात तरी त्यांना अत्यावश्‍यक सेवेत समाविष्ट करावेत, अशा पद्धतीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. ज्यांना ऑनलाईन बॅंकिंग करता येत नाही, अशांसाठी ही सेवा गरजेची असल्याचे या कंपनी प्रतिनिधींनीचे मत आहे. 

रेसिपीपासून ते संवादापर्यंत सारेच मोबाईलवर

लॉकडाऊनच्या काळात रेसिपीपासून ते संवादापर्यंत सारेच मोबाईलवर सुरु आहे. घरी बसणे सुरक्षित असले तरी रोजच्या गप्पा, बरे-वाईट हे सारे सोशल मिडियाच्या माध्यमातून सुरु आहे. फेसबूक, वॉटस्‌अपवर खूप महत्वाची माहिती मिळतेय, आम्हीही लोकांना घरी राहण्याचे आवाहन करतोय. "ई-सकाळ'च्या बातम्या मोबाईलवर वाचूनच अपडेट राहतोय.

- कोमल फडतरे, सांगली 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One and a half GB of data per day is not enough