esakal | 14 शाळाखोल्यांसाठी एक कोटी 30 लाख, आमदार लंके यांचे प्रयत्न 
sakal

बोलून बातमी शोधा

One crore 30 lakh for 14 schoolchildren, efforts by MLA Lanka

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून तालुक्‍यातील विविध गावांतील शाळाखोल्यांच्या बांधकामांसाठी हा निधी मंजूर केला. त्यात पारनेर, भाळवणी, पुणेवाडी व किन्ही या गावांतील शाळांना प्रत्येकी दोन शाळाखोल्यांसाठी 17 लाख 50 हजार मंजूर केले आहेत.

14 शाळाखोल्यांसाठी एक कोटी 30 लाख, आमदार लंके यांचे प्रयत्न 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पारनेर ः तालुक्‍यातील अनेक प्राथमिक शाळेच्या इमारती धोकादायक झाल्या असून, प्राथमिक शाळेच्या 14 वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी एक कोटी 30 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यात दलित वस्तीसाठी दीड कोटी, तर बाळासाहेब ठाकरे ग्रामसचिवालयाच्या इमारतीसाठी पाच गावांना 73 लाख 80 हजार मंजूर झाल्याची माहिती आमदार नीलेश लंके यांनी दिली. 

हेही वाचा - नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून तालुक्‍यातील विविध गावांतील शाळाखोल्यांच्या बांधकामांसाठी हा निधी मंजूर केला. त्यात पारनेर, भाळवणी, पुणेवाडी व किन्ही या गावांतील शाळांना प्रत्येकी दोन शाळाखोल्यांसाठी 17 लाख 50 हजार मंजूर केले आहेत.

गाजदीपूर, पोखरी, मांडवे खुर्द, काटाळवेढे या गावातील प्रत्येकी एका वर्ग खोलीसाठी आठ लाख 75 हजार मंजूर केले. वडुले, घाणेगाव, गटेवाडी, पाडळी दर्या, चिंचोली, पिंपरी पठार या पाच गावांसाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती ग्रामसचिवालयासाठी 73 लाख 80 हजार रुपये इतका भरीव निधी मंजूर असल्याची माहिती आमदार लंके यांनी दिली. 

loading image