esakal | निपाणी : दुचाकींच्या धडकेत एक ठार तीन जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

निपाणी : दुचाकींच्या धडकेत एक ठार तीन जखमी

sakal_logo
By
राजेंद्र हजारे

निपाणी - भरधाव जाणाऱ्या दोन दुचाकींची (Bike) समोरासमोर धडक (Accident) होऊन एक जागीच ठार (Death) तर तीन जण जखमी झाले. रविवारी (ता. २२) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास निपाणी-चिक्कोडी रोडवरील शिवा लॉजसमोर ही घटना घडली. बाळासाहेब देवाप्पा शिंपुकडे (वय ५२, रा. श्रीपेवाडी) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या अपघातात संजय रामा कोळी (वय ३७, रा. नसलापूर), मारुती रामा कोळी (वय ४०, रा. नसलापूर) आणि अभिजीत रामदास चव्हाण (वय २४, जत्राट वेस, निपाणी) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील महात्मा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, मृत बाळासाहेब शिंपुकडे हे एका हॉटेलमध्ये काम करत होते. काम आटोपून ते दुचाकीवरून (केए २३ इएन ७१८३) श्रीपेवाडीला जाण्यासाठी निपाणी बसस्थानकाकडे जात होते. त्याच वेळी नसलापूर येथील संजय कोळी व मारुती कोळी हे दुचाकीवरून (केए २३ इपी ९५२३) जात होते.

हेही वाचा: कोल्हापूर ‘झेडपी’चे स्वउत्पन्न केवळ चार टक्के

दरम्यान चिक्कोडी रोडवरील शिवा लॉजसमोर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. त्यामध्ये अभिजीत चव्हाण यांच्या दुचाकीवर बसलेले शिंपुकडे हे दुचाकीवरून बाजूला फेकले गेले. त्यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी रुग्णवाहिकेला माहिती दिल्यानंतर त्यामधील कर्मचाऱ्यांनी शिंपुकडे यांना मृत घोषित केले. तर उर्वरित जखमींना येथील महात्मा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

तिघांनाही गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. बसवेश्वर चौक पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे. मृत शिंपुकडे यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. रात्री उशिरा शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

loading image
go to top