पंढरपूरच्या उद्योजकाचा अपघाती मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

महालक्ष्मी मसालेचे उत्पादक तसेच लिंक रोडवरील महालक्ष्मी फर्निचरचे मालक सागर दोशी (रा. भादुले चौक, पंढरपूर) हे त्यांच्या अन्य काही सहकाऱ्यांसोबत परगावी गेले होते. मोहोळ- पंढरपूर रस्त्यावर एका हॉटेलमध्ये जेवण करून हे सर्वजण पंढरपूरकडे येत होते. सागर दोशी हे स्वतः गाडी चालवत होते.

पंढरपूर (सोलापूर) : येथील युवा उद्योजक सागर राजेंद्र दोशी (वय 31) यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. नदीच्या पलीकडील तीन रस्ता चौकात सागर दोशी यांची कार उलटली होऊन अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सागर दोशींचा मृत्यू झाला तर गाडीतील अन्य दोघे जखमी झाले आहेत. 
या अपघाताची पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, येथील महालक्ष्मी मसालेचे उत्पादक तसेच लिंक रोडवरील महालक्ष्मी फर्निचरचे मालक सागर दोशी (रा. भादुले चौक, पंढरपूर) हे त्यांच्या अन्य काही सहकाऱ्यांसोबत परगावी गेले होते. मोहोळ- पंढरपूर रस्त्यावर एका हॉटेलमध्ये जेवण करून हे सर्वजण पंढरपूरकडे येत होते. 
सागर दोशी हे स्वतः गाडी चालवत होते. तालुक्‍यातील शेगाव दुमाला गावाच्या हद्दीत तीन रस्ता चौकाजवळ गाडीचा पुढचा डाव्या बाजूचा टायर फुटल्याने गाडी उलटून अपघात झाला. या अपघातात सागर दोशी तसेच गाडीतील बाळू धोत्रे (वय 37, रा. महावीरनगर, पंढरपूर) व सोमनाथ टरले (वय 32, रा. पंढरपूर) 
हे जखमी झाले आहेत. सर्व जखमींना येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. सागर दोशी यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. या अपघात प्रकरणी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिस निरीक्षक किरण अवचर पुढील तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One dies in road accident at Pandharpur Mohal