अरे बापरे; एका हाताने तो उचलतो तब्बल 103 किलोचा दगड 

one hand he picks up a 103 kg stone
one hand he picks up a 103 kg stone

कागवाड (बेळगाव) : ऐनापूर येथील सिद्धेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त संग्राम दगड उचलण्याची स्पर्धा झाली. त्यात उत्तर प्रदेशातील पैलवान बैराट्टी दादा याने 103 किलो वजनाचा संग्राम दगड एकाच हाताने उचलून प्रथम क्रमांक पटकावला. गोल दगड उचलण्याच्या स्पर्धेत 180 किलोचा दगड उचलून नागठाण (जि. विजापूर) येथील बिरप्पा पुजारी याने बाजी मारली. 

स्पर्धेत कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेशमधील पैलवानांनी भाग घेतला होता. त्यात 96 किलोचा दगड उचलून मुन्नोळी (ता. सौंदत्ती) येथील मौलासाब चुरीखान याने द्वितीय, तर 90 किलोचा दगड उचलून सौदी (ता. अथणी) येथील आनंद कदम याने तृतीय क्रमांक मिळविला. सौंदत्ती तालुक्‍यातील साबीर पिरगोळी या सोळा वर्षाच्या युवकाने 75 किलोचा दगड एका हाताने उचलून स्पर्धेत उत्साह भरला. त्याला अनेक शौकिनांनी बक्षिसे दिली. 
160 किलोचा दगड मुधोळ तालुक्‍यातील चंद्रशेखर हुवार, 150 किलोचा नागठाणच्या कृष्णा पवार तर 140 किलोचा दगड शिवगुणसी (ता. अथणी) येथील अमृत गौडण्णवर याने उचलल्याने द्वितीय ते चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले. 
उद्‌घाटन व बक्षीस वितरण यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुभाष पाटील, उपाध्यक्ष राजूगौडा पाटील, रवींद्र गाणिगेर, संजय कुचनुरे, आदिनाथ दानोळी, बाहुबली कुसनाळे, उदय बाळीकाई, महेश सोलापूर, सिद्धाप्पा हळ्ळूर, राहुल बनजवाडे, अशोक अपराज यांच्या उपस्थितीत झाले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com