esakal | दादांचा आदेश पाळला; सांगलीच्या महापौर, उपमहापौरांचे राजीनामे 
sakal

बोलून बातमी शोधा

sangli municipal corporation mayor deputy mayor resignation

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा आदेश मानून महापौर संगीता खोत आणि उपमहापौर धीरज सूर्यवंशी यांनी आज महासभेत आपले राजीनामे सादर केले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी "इतर सदस्यांनाही संधी मिळाली पाहिजे. त्यामुळे राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. आज महासभा संपण्यापूर्वीच दोघांनीही आपले राजीनामे आयुक्त नितीन कापडनीस यांच्याकडे सादर केले. 

दादांचा आदेश पाळला; सांगलीच्या महापौर, उपमहापौरांचे राजीनामे 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा आदेश मानून महापौर संगीता खोत आणि उपमहापौर धीरज सूर्यवंशी यांनी आज महासभेत आपले राजीनामे सादर केले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी "इतर सदस्यांनाही संधी मिळाली पाहिजे. त्यामुळे राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. आज महासभा संपण्यापूर्वीच दोघांनीही आपले राजीनामे आयुक्त नितीन कापडनीस यांच्याकडे सादर केले. 

हे पण वाचा - तलाठ्याचा कारनामा ; शेतकऱ्यांच्या जमिनीच केल्या गायब 

महापालिकेत दीड वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपने स्वबळावर सत्ता हस्तगत केली होती. त्यानंतर महापौरपदी मिरजेच्या संगीता खोत, तर उपमहापौरपदी सांगलीचे धीरज सूर्यवंशी यांची निवड केली होते. दोघांनाही एक वर्ष मुदत देण्यात येणार होती. मात्र विधानसभा निवडणूक तसेच ऑगस्टमधील महापूर आणि वर्षाखेरीस राज्यातील अस्थिर परिस्थितीमुळे त्यांना मुदतवाढ मिळाली. दोघांनीही दीड वर्ष आपल्या पदाची जबाबदारी सांभाळली. 

हे पण वाचा - खोक्‍यांत विरतोय यंत्रांचा आवाज...

महापौरपद ओबीस महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. फेब्रुवारी 2021 पर्यंतच हे आरक्षण असल्याने इतर महिला सदस्यांनाही संधी मिळावी अशी महिला सदस्यांची इच्छा होती. मात्र पक्षाचे नेते याबाबत कधी निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दोन दिवसांपुर्वीच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महापौर संगीता खोत आणि उपमहापौर धीरज सूर्यवंशी यांना सोमवारच्या महासभेत राजीनामा देण्याचे आदेश फोनवरुन दिले होते. आज महापालिकेत महासभेचे आयोजन केले होते. यामध्येच सायंकाळी दोघांनीही आपले पदाचे राजीनामे सादर केले. 

उपमहापौर धीरज सुर्यवंशी यांनी आपला राजीनामा महापौर संगीता खोत यांच्याकडे सादर केला. त्यांनी तो स्वीकारल्यानंतर स्वत:चा राजीनामा आयुक्त नितीन कापडनीस यांच्याकडे सादर केला.