
आष्टा : ट्रॉलीला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे. याबाबत भाऊसाहेब अण्णाप्पा मुडे (वय ६१ मुडे मळा, रोझावाडी, ता. वाळवा) यांनी आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अपघातात कुमार भाऊ मुडे (वय ६५ मुडे मळा, रोझावाडी, ता. वाळवा) यांचा मृत्यू झाला आहे, तर ट्रॅक्टर चालक वसंत लक्ष्मण अलदर (बेवनूर, ता. जत) याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.