इचलकरंजीत अज्ञात व्यक्तींकडून तरुणाचा खून 

राजेंद्र होळकर
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

इचलकरंजी : इचलकरंजी नजीकच्या कबनूर येथे एका अज्ञात तरुणावर हल्लेखोरांनी पाठलाग करुन सशस्त्र हल्ला केला. या हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. त्याला उपचाराकरीता सांगली येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येत असताना त्याचा वाटेमध्ये मृत्यू झाला.

पोलिसांनी या सशस्त्र हल्ल्यात ठार झालेला तो तरुण कोण, त्याचा कोणी खून केला. तो कोणत्या कारणावरुन केला. याचा शोध सुरु केला आहे. दुपारी दोन वाजेपर्यत ठार झालेला तरुण कोण हे उघड झाले नव्हते. पोलिसांनी ठार झालेल्या त्या तरुणाची ओळख पटविण्याचे काम युध्द पातळीवर सुरु केले आहे.

घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, येथील स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, पोलिस उपनिरीक्षक अमोल माळी, शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक इरगोंडा पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रज्ञा चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक युवराज सुर्यवंशी, अनिल मोरे आदीनी भेट दिली. याबाबत शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

Web Title: One Murdered in Ichalkaranji