तिच्या सन्मानासाठी इनामधामणी ग्रामपंचायततीचे एक पाऊल पुढे

पती निधनानंतर परंपरेने चालत आलेल्या जुन्या रूढी परंपरांना मूठमाती देण्याची चळवळ जोर धरत आहे.
Inamdhamani Grampanchyat
Inamdhamani GrampanchyatSakal
Updated on
Summary

पती निधनानंतर परंपरेने चालत आलेल्या जुन्या रूढी परंपरांना मूठमाती देण्याची चळवळ जोर धरत आहे.

तुंग - पती निधनानंतर परंपरेने चालत आलेल्या जुन्या रूढी परंपरांना मूठमाती देण्याची चळवळ जोर धरत आहे. ग्रामपंचायतमध्ये महिलाराज आसलेल्या मिरज तालुक्यातील इनामधामणी गावाने विधवा आणि परितक्तत्या महिलांना केवळ सन्मानाची वागणूक न देता त्याच्या पुढे जाऊन पुनर्विवाहासह संसारोपयोगी वस्तू देऊन त्यांचे समाजातील स्थान अबाधित ठेवण्याचा ऐतिहासिक ठराव महिला ग्रामपंचायत सदस्याच्या उपस्थितीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

इनाम धामणीच्या सरपंच अश्विनी कोळी, उपसरपंच अनिता पाटील, ग्रामविकास अधिकारी रविंद्र शिंदे, सुहास पाटील, महावीर पाटील, अमोल कोळी यासह बैठकीस महिला ग्रामपंचायत सदस्या उपस्थित होत्या. विधवा महिलांच्या बाबतीत पूर्वापार परंपरेने चालत आलेल्या अनिष्ट चालीरीतीना नाकारुन या गावांमध्ये 100% विधवा परंपरा कायमस्वरूपी बंद करण्याचा व समाजात ताठ मानेने सन्मानाने राहण्याचा ऐतिहासिक निर्णय यावेळी घेण्यात आला. असा निर्णय घेणारे मिरज तालुक्यातील हे पहिले गाव ठरले.

सरपंच अनिता पाटील यांनी मांडलेल्या या ऐतिहासिक ठरावास राजमती प्रकाश मगदूम यांनी अनुमोदन दिले. यावेळी महिला सदस्यांनी टाळ्यांच्या गजरात ठरावाला सर्वानुमते मंजुरी दिली.

समाजातील विधवांना सन्मानाची वागणूक देऊन त्यांना विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेणे आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून त्यांचे पुनर्वसन करणे असा ठराव राज्यातील काही गावांमध्ये संमत करण्याची अंमलबजावणी सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर इनाम धामणी या गावांमध्ये ग्रामपंचायती वर महिलांची सत्ता असल्याने या ठरावाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

फक्त ठरावापुरते मर्यादित न रहाता याही पुढे जाऊन ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व शासनाच्या निधीतून विधवा व परितक्त्य महिलांना समाजामध्ये सन्मानाची वागणूक देण्यासाठी पुनर्वसनपूर्ण संसार स्थापनेची जबाबदारी गावातील मासिक सभेमध्ये घेण्यात आली आहे.

महिलाराज असणा-या ग्रामपंचायत सदस्याच्या मासिक सभेमध्ये विधवा महिला सन्मानच्या बाबतीत ऐतिहासिक ठराव करण्यात आला. या अनुषंगाने विधवा व परितक्त्या महिलांच्या सन्मानासाठी खर्च करण्यात येणारा निधी सार्थकी लागेल. असा ठराव करणााारे हे पहिले गाव आहे.

- अश्विनी कोळी, सरपंच, इनामधामणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jat Police Inspector sp action
Why has monsoon slowed in Sangli?
How did Dr. Nagnathanna Naikwadi resolve land disputes?
Railway Freight Hub Stained with Blood; Supremacy War Suspected in High-Profile Murder Case
Marathi News Esakal
www.esakal.com