इमारतीत प्रवेशाचा मुहूर्त सापडेना; कुशल चे बिल मिळेना

इमारतीत प्रवेशाचा मुहूर्त सापडेना; कुशल चे बिल मिळेना
Updated on: 

विभुतवाडी (सांगली) : ता. आटपाडी(Aatpati)येथे ग्रामपंचायत च्या नवीन इमारतीचे बांधकाम होऊन एक वर्ष उलटले तरीसुद्धा ग्रामपंचायतला नवीन इमारतीत प्रवेश करण्यासाठी मुहूर्त सापडेना. मुहूर्त सापडेना की जाणूनबुजून कानाडोळा होतोय हेच समजेना.गावाला स्वतःच्या मालकीची ग्रामपंचायतीची इमारत नव्हती. परंतु अनेक नेत्यांनी गावकऱ्यांनी प्रयत्न करून इमारत बांधकाम करण्याचे ठरवले .त्यासाठी जनसुविधा मधून 12 लाख रुपये, रोजगार हमी मधून 10 लाख रुपये, तर 14 वित्त आयोग मधून 10 लाख रुपये असे 32 लाख रुपये खर्च करून इमारत उभी केली आहे.

ठेकेदार ग्रामपंचायत स्वतः आहे .त्यांनी सब ठेकेदार पृथ्वीराज देशमुख यांना इमारतीचे काम दिले होते. त्यांनी ते काम वेळेत पूर्ण केले आहे.काही किरकोळ प्रमाणात त्यांचे बिल देणे बाकी आहे.याबाबत सरपंच चंद्रकांत पावणे यांना विचारले असता म्हणाले इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. परंतु कुशल चे पैसे आले नसल्याने सब ठेकेदाराची थोडीफार रक्कम देणे बाकी आहे. कुशल ची रक्कम मिळताच त्यांचे बिल आम्ही लगेच देणार आहोत.ग्रामसेवक संदीप वळवी म्हणाले फर्निचर चे काम करण्यासाठी दिले आहे .फर्निचरचे काम पूर्ण होताच ग्रामपंचायत चे कामकाज नवीन इमारतीमध्ये सुरू करणार आहे.

ग्रामपंचायतला स्वतःच्या मालकीची इमारत असावी म्हणून माजी समाज कल्याण सभापती कुसुम मोटे व माझी समाज कल्याण सभापती व जिल्हा परिषद सदस्य ब्रम्हानंद पडळकर,ग्रामसेवक डी.के.गळवे व ग्रामस्थांनी प्रयत्न केले होते.सरपंच चंद्रकांत पावणे म्हणतात कुशल चे बिल आले नाही. ग्रामसेवक म्हणतात फर्निचर चे काम दिले आहे. सब ठेकेदार म्हणतात माझे बिल अडकले आहे. अशी प्रत्येकाकडून वेगवेगळी उत्तरे येत आहेत .त्यामुळे ग्रामपंचायत इमारतीतील प्रवेशाला मुहूर्त मिळेना की काय अशी चर्चा नागरिकात रंगली आहे.

ग्रामपंचायत इमारतीचे काम पूर्ण केले आहे परंतु माझे बिल येणे बाकी आहे.

- पृथ्वीराज देशमुख सब कॉन्ट्रॅक्टदार

2. कुशल चे बिल येणे बाकी आहे. बिल मिळताच सब ठेकेदाराचे बिल देण्यात येईल.

- चंद्रकांत पावणे सरपंच

3. इमारत पूर्ण झाली आहे. फर्निचरचे काम पूर्ण होताच नवीन इमारतीत कामकाज सुरू होईल. - संदीप वळवी ग्रमसेवक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Raju Shetti's aggressive demand to give first installment of Rs 4,500
Break Fail Baija Purchased for ₹61 Lakh in Athani
Ujwala Tingre MPSC Achievement Inspires Rural Students as Daughter of Labourer Mother and Shepherd Father Becomes Officer
Shambhuraj Desai Koyna dam water dispute