esakal | शेतकऱ्यांसाठी Good News: आता आटपाडीत होणार कांदा खरेदी  मार्केट
sakal

बोलून बातमी शोधा

onion market started in in Atpadi sangli farming marathi news

सध्या बाजार समितीमध्ये डाळिंब खरेदी सुरू केलेली आहे. त्याच बरोबर कांदा खरेदी सुद्धा बाजार समिती सुरू करावी त्यामुळे शेतकऱ्यांचा सांगली मार्केट ला जाण्याचा वाहतूक खर्च वाचेल. अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.

शेतकऱ्यांसाठी Good News: आता आटपाडीत होणार कांदा खरेदी  मार्केट

sakal_logo
By
सदाशिव पुकळे

झरे (सांगली) : आटपाडी बाजार समितीने कांदा खरेदी मार्केट सुरू करावे. अशी शेतकऱ्यांची अनेक दिवसांपासून मागणी होत आहे. तालुक्यामध्ये सर्वच गावांमधून कांदा पिकवला जातो. परंतु कांदा विक्रीसाठी सांगलीला बाजार समितीमध्ये जावे लागते. त्यासाठी वाहतूक खर्च वाढतो व तिथे गेल्यानंतर दर देण्यावरून व्यापाऱ्यांची मनमानी सुरू असते.

या सर्व गोष्टीला वैतागून अनेक दिवसापासून शेतकरी बाजार समितीकडे कांदा खरेदी मार्केट सुरू करण्याची मागणी करीत आहेत. सध्या बाजार समितीमध्ये डाळिंब खरेदी सुरू केलेली आहे. त्याच बरोबर कांदा खरेदी सुद्धा बाजार समिती सुरू करावी त्यामुळे शेतकऱ्यांचा सांगली मार्केट ला जाण्याचा वाहतूक खर्च वाचेल. अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.

या मागणीचा विचार करुन बाजार समितीच्या झालेल्या सभेमध्ये सर्वच संचालकांनी कांदा खरेदी मार्केट सुरू करण्याची मागणी लावून धरली होती. तर चेअरमन भाऊसाहेब गायकवाड, व्हा चेअरमन दिलीप खिलारी यांनी कांदा खरेदी मार्केट सुरू करण्यासाठी सहमती दर्शवली व सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला आहे.

आटपाडी बाजार समितीमध्ये कांदा मार्केट लवकरच सुरू होईल त्यामुळे शेतकऱ्यांचा सांगलीला जाण्याचा वाहतूक खर्च वाचेल व कांद्याला दरही चांगला मिळेल. आणि कांदा मार्केट जवळ झाल्यामुळे कांद्याचे उत्पादन निश्चितपणे वाढेल तरी बाजार समितीने लवकरात लवकर कांदा मार्केट सुरू करावे अशी शेतकरी वर्गातून अनेक दिवसापासून  मागणी होती. त्या मागणीचा विचार करून बाजार समितीने कांदा खरेदी मार्केट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे 

हेही वाचा- सांगली : शिराळात गोठ्यास आग; 5 जनावरांचा होरपळून मृत्यू

दिनांक 31 मार्च रोजी संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये कांदा खरेदी मार्केट सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चेअरमन भाऊसाहेब गायकवाड व्हाईस चेअरमन दिलीप खिलारी व संचालक मंडळाने कांदा खरेदी मार्केट सुरू करण्यासाठी सहमती दर्शवली आहे

- शशिकांत जाधव- सचिव मार्केट कमिटी आटपाडी

संपादन- अर्चना बनगे

loading image