esakal | कांद्याचा दर भडकला! क्विंटलमागे तब्बल हजार रुपयांची वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

कांद्याचा दर भडकला!

मागील बाजारात कांदा प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये होता.

कांद्याचा दर भडकला!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) शनिवारी (२) बाजाराच्या दिवशी ६० गाड्या कांद्याची आवक झाली असून कांद्याला प्रतिक्विंटल ३५०० रुपये दर मिळाला. गेल्या बाजाराच्या तुलनेत कांदा दरात १ हजार रुपयांनी वाढ झाली. महाराष्ट्रातील जुना कांदा २० गाड्या तर कर्नाटकातील नवीन कांद्याची ४० गाड्या आवक झाली. कांद्याला मागणी खुप आहे. नवीन कांद्याचा दर्जा कमी आहे. जुना कांदा चागला असून याच कांद्यात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे.

मागील बाजारात कांदा प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये होता. आजच्या बाजारात २८०० ते ३५०० हजार रुपये झाला. नवीन कांदा मागील बाजारात १००० ते १८०० रुपये होता. आज १५००ते २८०० पर्यंत झाला. कांदा पावसामुळे खराब झाला आहे. कर्नाटकातील कांद्यावर विशिष्ठ प्रकारचा रोग आहे. त्यामुळे अडचण येत आहे. अवघ्या पाच दिवसांवर नवरात्री आल्यामुळे एपीएमसीत रताळ्यांना मागणी वाढली. मात्र, अधून मधून पाऊस सुरु असल्याने म्हणावा तसा रताळ्यांचा माल बाजारात दाखल झाला नाही.

हेही वाचा: खा की खा! मासे खरेदीसाठी हर्णे बंदरावर खवय्यांची तुफान गर्दी

स्थानिक भागातील रताळी येत आहेत. महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश येथे निर्यात होते. सुमारे १५००० पिशव्या आवक होती. रताळ्यांना प्रतिक्विंटल १००० पासून १३०० रुपये दर होता. गेल्या बाजाराच्या तुलनेत या बाजारात २०० रुपयांनी वाढ झाली. दरवर्षी नवरात्रीला मोठ्या प्रमाणात रताळ्यांची मागणी असते. सध्या तालुक्याच्या पश्‍चिम भागात रताळी काढणी सुरु आहे. गेल्या महिनाभरापासून रताळी बाजारात दाखल होत आहेत. मात्र, आता रताळ्यांना मागणी वाढल्याने रताळी अधिक प्रमाणात दाखल होत आहेत. बेळगाव स्थानीक बटाटा १२०० पासून १६०० पर्यंत होता. तसेच इंदूरही सरासरी १६०० रुपये होता. बटाट्यालाही मागणी आहे. बटाट्याची सुमारे ३ हजार पिशव्या आवक होती.

"एपीएमसीत कांदा, बटाटा व रताळ्यांची चांगली आवक होत आहे. शनिवारच्या बाजारात कांदा दरात एक हजार रुपये वाढ झाली होती. सुमारे ६० गआड्या दाखल झाल्या. ग्राहकांकडूनही प्रतिसाद आहे."

- महेश कुगजी, सदस्य, एपीएमसी

हेही वाचा: खास गोड चवीच्या भोपळ्याच्या 'घाऱ्या'; वाचा सोपी रेसिपी

loading image
go to top