esakal | Receipe - खास गोड चवीच्या भोपळ्याच्या 'घाऱ्या'; वाचा सोपी रेसिपी
sakal

बोलून बातमी शोधा

खास गोड चवीच्या भोपळ्याच्या 'घाऱ्या'; वाचा सोपी रेसिपी

महाराष्ट्रात जानेवारी महिन्यात येणाऱ्या संक्रातीच्या सणाला हा पदार्थ बनवला जातो.

खास गोड चवीच्या भोपळ्याच्या 'घाऱ्या'; वाचा सोपी रेसिपी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

भोपळ्याची 'घारी' म्हटलं की आपल्याला तोंडाला पाणी सुटते. 'घारी' हा पदार्थ पश्चिम महाराष्ट्रात सर्रास खाल्ला जातो. मात्र राज्यातील इतर प्रदेशात हा पदार्थ खाण्याचे प्रमाण दुर्मिळ आहे. कदाचित याला वेगवेगळ्या नावावेही ओळखले जात असावे. मात्र अनेक खवय्ये हा पदार्थ तितक्याच चवीने आणि आवडीने खातात. 'घारी'च नाव जरी घेतलं तरी तिचा गोडवा जिभेवर रेंगाळत राहतो. महाराष्ट्रात जानेवारी महिन्यात येणाऱ्या संक्रातीच्या सणाला हा पदार्थ बनवला जातो. ग्रामीण भागासह शहरांतही भोपळ्याच्या घाऱ्या अनेकजण चवीन खातात. अतिशय सोपी आणि अगदी मोजक्याच साहित्यात ही रेसिपी बनवली जाते. मऊ, गोड घारी कशी बनवावी याची रेसिपी आपण आता पाहणार आहोत.

हेही वाचा: माझी पाककृती : नाचणीच्या पिठाचे धिरडे

साहित्य -

  • भोपळा - १ छोट्या आकाराचा

  • गूळ - ४ कप छोटे

  • गहू पीठ - अर्धा किलो

  • वेलची - आवश्यकतेनुसार

  • मीठ - आवश्यकतेनुसार

  • खसखस - आवश्यकतेनुसार

  • तेल - आवश्यकतेनुसार

हेही वाचा: पोषक-पूरक : गुणकारी बदाम

कृती -

सुरुवातीला भोपळा स्वच्छ धुऊन घ्यावा. यानंतर तो छोट्या छोट्या आकारात कापून घ्यावा. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात हे काप शिजत टाका. हे शिजवताना यात सुके गवत किंवा पिंजराचा वापर करा. शिजलेला भोपळा एका भांड्यामध्ये घेऊन स्मॅश करून बाजूला ठेवा. दुसरीकडे एका भांड्यात आवश्यक तेवढे गव्हाचे पीठ घ्या, यात किसलेला गुळ आणि वेलची पावडर टाका. शक्यतो हे पीठ ओलसर (थोडे पातळ) ठेवावे. पुरीच्या आकाराप्रमाणे या तयार मिश्रणाच्या छोट्या छोट्या घाऱ्या बनवाव्या. यासाठी तु्म्ही पोळपाटाचा वापर करु शकता. पोळपाटावर ओले कापड टाकून त्यावर तयार पीठाला पुरीप्रमाणे आकार द्या. (या पीठाचा गोळा घेऊन तो हाताने अलगत भाकरीप्रमाणे थापटून घ्यावा.) त्याला वरच्या बाजूला दोन खसखसची बोटे लावावीत. कढईमध्ये तेल टाकावे आणि गरम तेलात लालसर घाऱ्या तळून घ्याव्यात. गोड, मऊमऊ भोपळ्याची घारी तयार आहे. तुम्ही चहासोबत खाऊ करु शकता.

loading image
go to top