नोकरीचे आमिष; वाचा कसे फसवले तरुणीला..

परशुराम कोकणे
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

सोलापूर  : बेरोजगार तरुणीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोन लाख सहा हजार 825 रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी विजापूर नाका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा : सोलापुरात 'या' रस्त्यांवर वाटते महिलांना भीती!

सोलापूर  : बेरोजगार तरुणीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोन लाख सहा हजार 825 रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी विजापूर नाका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा : सोलापुरात 'या' रस्त्यांवर वाटते महिलांना भीती!

तुमची नोकरी नक्की झाली..
मालाश्री विठ्ठलराव वठारे (वय 27, रा. नवोदय टेरेस, मोहितेनगर, सोलापूर) असे फसवणूक झालेल्या तरुणीचे नाव आहे. मालाश्री यांचे वडील रेल्वे खात्यात नोकरी करून सेवानिवृत्त झाले आहेत. नोकरीची गरज असल्याने त्यांनी क्विकर जॉब्स या वेबसाइटवर नोंदणी केली होती. त्यांना 3 सप्टेंबर रोजी माही शर्मा नावाच्या महिलेचा फोन आला. त्या महिलेने क्विकर जॉब या कंपनीतून एचआर बोलत असल्याचे सांगितले. तुमची ऍक्‍सिस बॅंक व अकाउंटंटकरिता निवड झाली आहे असे सांगितले. तुमची नोकरी नक्की झाली असून नोंदणीकरिता दोन हजार रुपये पाठवावे, असे सांगितले. कंपनीकडून केलेल्या मागणीनुसार मालाश्री यांनी दोन हजार रुपये भरले. कागदपत्रे तपासणी फी, बॅंकेत खाते उघडण्याकरिता, मेडिक्‍लेम, ड्रेस कोड, तसेच नोकरीतून मिळणाऱ्या पहिल्या पगाराची सुरक्षित ठेव असे विविध कारण सांगून आरोपींनी मालाश्री यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले.

हेही वाचा : विशेष सरकारी वकिलांनी न्यायालयात केली "ही' विनंती

फसवणूक झाल्याचा संशय आला
दरम्यान, दिवाळीच्यावेळी नोकरीचा अर्ज भरण्यास विलंब झाला असे सांगून आणखी 28 हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले. परंतु दिवाळी असल्याने मालाश्री यांनी ते पैसे भरले नाहीत. त्यानंतरही त्यांना आरोपींकडून वेळोवेळी पैसे भरण्यास सांगण्यात आले. पैसे भरूनही नोकरी मिळत नसल्याने मालाश्री यांना फसवणूक झाल्याचा संशय आला. आरोपींनी मालाश्री यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने दोन लाख 6 हजार 825 घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online cheating on young girl