सांगली जिल्ह्यासाठी 14 जुलैला ऑनलाईन रोजगार मेळावा 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 July 2020

सांगली, ः जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे सांगली जिल्ह्यातील नोकरी इच्छुक तसेच स्वयंरोजगार करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी ऑनलाईन करिअर मार्गदर्शन व रोजगार स्वयंरोजगार संधी या विषयावर ऑनलाईन रोजगार मेळावे 14 व 15 जुलै रोजी आयोजित करण्यात येत आहेत. इच्छुकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त एस. के. माळी यांनी केले आहे. 

सांगलीत वेब सेमिनार 6 जुलै रोजी झाला. सेमिनारमध्ये महाराष्ट्र अकॅडमी इस्लामपूरचे संस्थापक सचिव अस्लम शिकलगार, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नितीन कोळेकर यांनी मार्गदर्शन केले. बीज भांडवल योजना, जिल्हा उद्योग कर्ज योजना, पंतप्रधान रोजगार निर्मित कार्यक्रम उद्योजकता विकास मोफत प्रशिक्षण योजना, उद्योजकासाठी पॅकेज स्कीम इनसेंटीव्ह योजना, समूह उद्योजक विकास योजना आदिंबाबत मार्गदर्शन झाले. 

सहाय्यक आयुक्त एस. के. माळी यांनी ऑनलाईन रोजगार मेळाव्याची कल्पना विषद केली. उद्योजकांकडे मनुष्यबळाची कमतरता निर्माण झाली असून ती भरून काढण्यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करून घेण्याचे आवाहन केले. ज्या उद्योजकांकडे रिक्तपदे भरावयाची आहेत त्यांनी वेबपोर्टलव्दारे पदे नोंदवावीत. 14 व 15 जुलै रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा होणार आहे. 
............................. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online employment fair for Sangli district on 14th July