खड्डे तत्काळ बुजवा अन्यथा रस्त्यावर फिरू देणार नाही...

otherwise it will not allow you to walk on the road ...
otherwise it will not allow you to walk on the road ...

कुपवाड : लक्ष्मीमंदिर ते कुपवाड चौक मार्गावर पडलेल्या खड्ड्यांच्या निषेधार्थ शहर शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. महापालिकेचे सहाय्यक आयुक्त पराग कोडगुले यांना खड्डे बुजवण्याबाबत शिवसैनिकांनी निवेदन दिले. 

लक्ष्मीमंदिर ते सूतगिरणीचा मार्ग दिवसरात्र रहदारी वर्दळीचा असतो. औद्योगिक वसाहतीच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. त्यावर पडलेल्या भल्या मोठ्या खड्डयांमुळे वाहतूक धोक्‍याची बनली आहे. प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतली नाही. सततच्या हलगर्जीपणामुळे अपघातात होणारी वाढ धक्कादायक आहे. तात्काळ खड्डे बुजवण्याची गरज दर्शवत रास्ता रोको करून कुपवाडच्या शिवसैनिकांनी सोमवारी आक्रमक पवित्रा घेतला. तातडीने खड्डे मुजवा अन्यथा एकाही महापालिका अधिकाऱ्यास रस्तावर फिरकू देणार नाही, असा इशारा त्यांनी कुपवाड सहाय्यक आयुक्त कोडगुले यांना दिला. 

शहर प्रमुख रुपेश मोकाशी म्हणाले,""रस्त्यावरचे मोठे खड्डे मृत्यूचे सापळे बनलेत. अपघाताची मालिका दैनंदिनपणे सुरूच आहे. लोक जीव मुठीत धरून प्रवास करतात. मात्र प्रशासनाचे संपूर्ण दुर्लक्ष आहे. कोणताही नगरसेवक बोलत नाही. परिस्थितीचे गंभीर्य त्यांना नाही. मंगळवारी सुरळीत खड्डे न बुजवल्यास रास्ता रोको करू. नगरसेवकासह एकाही महापालिका अधिकाऱ्याला रस्त्यावर फिरू देणार नाही.''  संतोष पाटील, विठ्ठल संकपाळ, प्रसाद रिसवडे, सूरज कासलीकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

पारा चढला... 
शहराध्यक्ष मोकाशी सहकाऱ्यांसह सहाय्यक आयुक्त पराग कोडगुले यांना निवेदन देण्यासाठी गेले असता दोघांत बाचाबाची झाली. "रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवा अन्यथा रस्त्यावर फिरू देणार नाही' असे म्हणून मोकाशींनी संताप व्यक्त केला. कोडगुले यांनी "ठीक आहे मग मी घरीच बसतो' असे सांगितले. हे ऐकून शिवसैनिक आणखी संतापले.


संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com