पडळकर यांचा पहिला निधी  रुग्णवाहिकांच्या खरेदीसाठी 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 September 2020

आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या पहिल्या आमदार निधीतून तीन ऑक्‍सिजनसह रुग्णवाहिकांची खरेदी करून प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्याचा निर्णय घेतला. सध्याच्या काळात ग्रामीण आरोग्य व्यवस्था सदृढ करण्याची गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे त्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

आटपाडी (सांगली) ः आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या पहिल्या आमदार निधीतून तीन ऑक्‍सिजनसह रुग्णवाहिकांची खरेदी करून प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्याचा निर्णय घेतला. सध्याच्या काळात ग्रामीण आरोग्य व्यवस्था सदृढ करण्याची गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे त्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

आमदार झाल्यानंतर त्यांना 51 लाख रुपयांचा पहिला निधी मिळाली आहे. त्यातून विटा, आटपाडी ग्रामीण रुग्णालय आणि खरसुंडी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ऑक्‍सीजनसह तीन रुग्णवाहिका घेतल्या जाणार आहेत. यासंबंधी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत. विकास निधीतून आरोग्यासाठी तब्बल 51 लाख रुपये निधी देणारे राज्यातील पहिले आमदार ते ठरले आहेत. 

विधान परिषद आमदारांना विकास निधी टप्प्या टप्प्यात प्राप्त होतो. यातून आमदार आपल्या मतदारसंघातील लोकांच्या गरजा ओळखून कामे सुचवतात. सध्या कोरोनाचे संकट गंभीर बनले आहे. सांगलीपासून आटपाडी तालुका शंभर किलोमीटर अंतरावर आहे. गंभीर रुग्णांना तातडीने उपचार मिळत नाहीत. याशिवाय रुग्णालयात असलेल्या रुग्णवाहिका अनेक वेळा बंद असतात. त्यामुळे पडळकर यांनी हा निर्णय घेतला. एका रुग्णवाहिकेला सतरा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: padalkars fund for ambulance