Rajapur News : 30 तासात पडवे गावच्या सुपुत्रांनी तब्बल सहा किल्ले केले सर

स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी ठिकठिकाणी दूदरदर्शीपणातून बांधलेले किल्ले सार्‍यांच्याच आकर्षणाचे केद्रबिंदू ठरलेले आहेत.
Padve Village Youths
Padve Village YouthsSakal

राजापूर - सलग दोन दिवसामध्ये सुमारे पन्नास तास प्रवास करीत त्या पन्नास तासांपैकी सुमारे तीस-पस्तीस तासांमध्ये दुर्गम आणि डोंगरी भागातील अवघड असलेले तब्बल सहा किल्ले सर करीत तालुक्यातील पडवेचे सुपूत्र गिर्यारोहक प्रथमेश वालम आणि सहकार्‍यांनी अनोख्या पद्धतीने प्रजासत्ताक दिनी तिरंगी झेंड्याला मानवंदना दिली.

प्रतिकूल परिस्थितीचा निकराने सामना करीत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दोन दिवसांमध्ये समुद्र सपाटीपासून सुमारे चार-साडेचार फूट उंची असलेले अजिंठा सातमाळा डोंगररांगेतील अचलागड, अहिवंत, धोडप, कोळधेर, राजदेर आणि इंद्राई असे सहा गडकिल्ले सर करण्याची मोहिम प्रथमेश आणि सहकार्‍यांनी दोन दिवसांमध्ये फत्ते केली.

मानसिक आणि शारीरीक क्षमतेचा कस लावणार्‍या या अनोख्या मोहिमेमध्ये गिर्यारोहक प्रथमेश वालम यांच्यासह रूपेश बंडबे, शिवाजी बोडके, आकाश शेलार, सुशांत खोंडगे आदी सहकारी सहभागी झाले होते. गिर्यारोहणाची अनोखी मोहिम फत्ते केल्याबद्दल आणि अनोख्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा केल्याबद्दल प्रथमेश आणि सहकर्‍यांचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.

स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी ठिकठिकाणी दूदरदर्शीपणातून बांधलेले किल्ले सार्‍यांच्याच आकर्षणाचे केद्रबिंदू ठरलेले आहेत. खाजगी नोकरी करीत सुट्टीच्या कालावधीमध्ये असे दुर्गम गडकिल्ले सर करण्याचा छंद प्रथमेश आणि सहकार्‍यांकडून गेल्या कित्येक वर्षापासून जोपासला जात आहेत.

त्यातून दिडशेहून अधिक किल्ले आजपर्यंत विविध मोहिमांच्या माध्यमातून सर केले आहेत. त्याप्रमाणे यावर्षी अनोख्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचा त्यांनी निर्धार केला. त्यातन, नाशिक जिल्ह्यातील चांदवड आणि ळकळवण तालुक्यातील दुर्गम किल्ले सर करण्याचा त्यांनी निर्धार केला.

दाट जंगल आणि दुर्गम डोंगरी परिसरामध्ये बिबट्यासह अन्य हिंस्त्र वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या या किल्ले परिसरामध्ये रात्रीच्या काळोख्यामध्ये प्रवास करणे धोकादायक अन् अवघड होते. त्याचवेळी सकाळच्या सत्रातील कडाक्याची थंडी, दुपारचे रखरखते ऊन आणि किल्ल्याच्या टोकावर वेगाने वाहणारा वारा याच्यातून निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीचा सातत्याने सामना करावा लागत होता. त्यातून, शारीरीक आणि मानसिकत क्षमतेचा कस पाहणारी ही मोहिम ध्येयपूर्तीला दृढ निश्‍चियाची जोड देत प्रथमेश आणि सहकाररी गिर्यारोहकांनी फत्ते केली.

प्रथमेश वालम, गिर्यारोहक -

'दाट जंगल आणि दुर्गम परिसर, विस्ताराने काहीसे मोठे असलेले नजीकच्या परिसरातील अवघड असलेले सहा किल्ले सर करण्याचा निर्धार सर्व मित्रांनी केला होता. त्यामध्ये दोन दिवसांतीस सुमारे पन्नासा तासांच्या प्रवासातील सुमारे 30-35 तासांच्या कालावधीमध्ये सहा किल्ले सर केले.

पहिल्या दिवशी पहाटे चार-साडेचार वाजता शुभारंभ झालेल्या या मोहिमेचा शेवट दुसर्‍या दिवशी रात्री उशीरा झाला. या मोहिमेतील अनुभव निश्‍चितच अलौकीक आणि रोमांचकारी होता. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील प्रेम, निष्ठेला ध्येयाची जोड मिळाल्याने ही मोहिम फत्ते करणे शक्य झाले.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com