पायजमा कॉलेजचा कोरियन विद्यापीठाशी करार 

new arts college
new arts college

नगर : नगर जिल्ह्यात गरिबांचे समजल्या जाणाऱ्या कॉलेजने कात टाकली आहे. आता या कॉलेजने थेट कोरियासोबत करार केला आहे या कॉलेजमध्ये बहुतांशी शेतकऱ्यांची मुले शिक्षण घ्यायची. त्यामुळे या कॉलेजला पायजमा कॉलेज म्हणून हिणवले जायचे. परंतु हे कॉलेजची कीर्ती आता जगभरात गेली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सर्वात मोठे कॉलेज म्हणून याची ख्याती आहे. 
आजही या महाविद्यालयातील विद्यार्थी सुगीच्या दिवसात सुटी घेतात. 

नंतरच्या काळात या महाविद्यालयाने मोठी प्रगती केली. देश-विदेशात या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. आता तर 
परदेशी संस्थेसोबत करार झाल्याने त्यात भरच पडली आहे. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नगर येथील न्यू आर्टस, कॉमर्स ऍण्ड सायन्स महाविद्यालयाने कोरिया नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ ट्रान्स्पोर्टेशनसोबत पाच वर्षांचा शैक्षणिक सहकार्य करार आज (गुरूवारी) केला. आपल्या कार्यक्षेत्रात मनुष्यबळ विकसित करण्यासाठी व संस्थात्मक गुणवत्तावाढीसाठी दोन्ही संस्था मिळून पुढील पाच वर्षे विविध उपक्रम राबवणार आहेत. 

कोरिया नॅशनल युनिव्हर्सिटीचे प्रा. इनसिल इन व "न्यू आर्टस'चे प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे यांनी एकमेकांना कराराच्या प्रती प्रदान केल्या. यामध्ये "न्यू आर्टस'मधील निवडक विद्यार्थी व प्राध्यापकांना कोरियातील या विद्यापीठात जाऊन काही दिवस काम करता येईल व कोरियन विद्यापीठातील निवडक विद्यार्थी व प्राध्यापक "न्यू आर्टस'मध्ये येऊन परस्पर सहकार्याने काम करतील. या उपक्रमाचा दोन्ही संस्थांना फायदा होणार आहे. 

नगरमधील विद्यार्थ्यांना यानिमित्ताने सहज परदेशी शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. 
सुवर्णजयंती वर्ष साजरे करणाऱ्या "न्यू आर्टस'साठी ही मोठी उपलब्धी आहे. महाविद्यालयाने करार केलेले कोरियन विद्यापीठ देदीप्यमान परंपरा असलेले विद्यापीठ आहे. त्याचा येथील विद्यार्थी व प्राध्यापकांना भविष्यासाठी मोठा उपयोग होईल, असा विश्‍वास प्राचार्य डॉ. झावरे यांनी या वेळी व्यक्त केला. उपप्राचार्य डॉ. अरुण पंदरकर, आर. जी. कोल्हे, प्रा. अनिल आठरे, प्रा. गिरीश कुकरेजा उपस्थित होते. या कराराबद्दल संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे यांनी सर्वांचे अभिनंदन केले. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com