esakal | पळसखेल रस्त्यावर भिषण अपघात; लातूरच्या 2 महिला कामगारांचा जागीच मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

पळसखेल रस्त्यावर भिषण अपघात; लातूरच्या 2 महिलांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आटपाडी (सांगली) : पळसखेल ते आवळाई रस्त्यावर दिघंची जवळ पळसखेल फाट्यावर पिकप गाडी आणि कार गाडीची समोरा समोर धडक होऊन चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या महिलांच्या अंगावर पिकप गाडी जाऊन झालेल्या विचित्र अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी झाली. मंगल बंडगर वय. २६ आणि ताई बंडगर वय. १६ रा.शिरोळ जि. लातूर असे मृत महिलांचे नाव आहे. (palaskhel-to-awalai-two-women-died-sangli-news )

याबाबत अधिक माहिती अशी की,

पळसखेल हद्दीत स्टोन क्रशर चालू आहे. त्यावर लातूर जिल्ह्यातील महिला कामगार म्हणून कामाला होत्या. काल दुपारी या महिला पाणी आणण्यासाठी पळसखेल येथील कोळेकर वस्तीवर निघाल्या होत्या. दरम्यान यावेळी कारगाडी एम. एच. ४२- ए.एच. २३४९ ही पळसखेल गावातून दिघंचीकडे भरधाव वेगाने येत होती. तर दुसऱ्या बाजूने भरधाव वेगाने टेम्पो एम. एच. 10 बी. आर. 41 65 जात होता. दोन्ही गाड्या भरधाव वेगात होत्या.

चालकाचा अंदाज चुकल्याने कार गाडी आणि पिकप टेम्पो गाडीची समोरा समोर धडक झाली. त्यामुळे टेम्पो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या तीन महिलांच्या अंगावर गेला. या धडकेत मंगल कृष्णा बंडगर वय. २५ आणि ताराबाई बालाजी बंडगर वय .१६ दोघेही सध्या रा.पळसखेल, मुळगाव शिरोळ, ता. निलंगा, जि. लातूर यांचा जागीच मृत्यू झाला तर पूजा बंडगर गंभीर जखमी झाल्या. यातील मंगल बंडगर यांना अवघ्या सहा महिन्याची एकच मुलगी आहे. या घटनेची आटपाडी पोलिस ठाण्यात नोंद केली आहे.

loading image