Sangli Crime: पलूस परांजपे कॉलनीतील चोरीचा छडा, मुद्देमाल जप्त, संशयित महिलेला पलूस पोलिसांनी घेतले ताब्यात
Paranjape Colony Theft Solved in Palus: संशयित म्हणून कांचन कुंभार या महिलेला पलूस पोलिसांनी ताब्यात घेतले असता, तिने चोरीची कबुली दिली. तिच्याकडून चोरीला गेलेले ४ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. संशयित महिलेस अटक करण्यात आली.
Palus Police recover stolen property from woman accused in Paranjape Colony theft case.sakal
पलूस : येथील परांजपे कॉलनीतील चोरी प्रकरणी पलूस पोलिसांनी कांचन बाबूराव कुंभार (वाझर, ता. खानापूर) या महिलेस ताब्यात घेऊन तिच्याकडून चोरीला गेलेले ४ तोळे सोन्याचे मणिमंगळसूत्र व ५० हजार रुपये रोख असा ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.