कर्जाचा तगादा, पतीसह पत्नीने उचललं टोकाचं पाऊल; पलूस तालुका हादरवणारी घटना

Husband-Wife Die After Consuming Poison in Palus : कर्जाच्या तगाद्यातून दोघांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पुढे येत असून, या दिशेने पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Palus Husband Wife

Palus Husband Wife

esakal

Updated on

सांगली : पलूस शहरातील गंजीखाना परिसरात पती-पत्नीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाळासाहेब मुरलीधर कदम (वय ५८) यांचा सोमवारी (दि. ३१) राहत्या घरी मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी उषा बाळासाहेब कदम (वय ४६) यांचा मंगळवारी (दि. १) सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. कर्जाच्या तगाद्यातून दोघांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पुढे येत असून, या दिशेने पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com