पलूस तालुका हायअलर्टवर 

संजय गणेशकर 
Thursday, 9 July 2020

पलूस (सांगली) ःगेल्या महिनाभरापासून आणि अलीकडे पंधरा दिवसात पलूस तालुक्‍यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. ही चिंतेची बाब आहे. आज अखेर पलूस तालुक्‍यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 47 वर जाऊन पोहोचली आहे.

पलूस (सांगली) ःगेल्या महिनाभरापासून आणि अलीकडे पंधरा दिवसात पलूस तालुक्‍यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. ही चिंतेची बाब आहे. आज अखेर पलूस तालुक्‍यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 47 वर जाऊन पोहोचली आहे.

कोराना साथीच्या पार्श्वभूमीवर लॉंकडाऊन जाहीर झालपासून 5 जून पर्यंत पलूस तालुक्‍यात कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नव्हता. मात्र, 6 जून रोजी मुंबई येथून आलेल्या व संस्थात्मक क्वारंटाईन असलेल्या एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. 

तालुक्‍यात कोरोना ग्रस्तांची संख्या वाढत गेली. विशेषतः बाहेरून आलेल्या व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह येत होत्या. मात्र, आंधळी येथील एका स्थानिक व्यक्तीला कोरानाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. एक महिला कोरोनाने मयत झाली आहे. प्रशासनाने दखल घेतल्यामुळे पलूस तालुक्‍यात कोरोनाचा प्रसार झाला नाही.

प्रशासनाने बाहेरून आलेल्या जवळपास आतापर्यंत सहा हजारपेक्षा जास्त नागरिकांना क्वारंटाईन करून, त्यांचेवर देखरेख ठेवली. यामध्ये तहसीलदार राजेंद्र पोळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव, गटविकास अधिकारी राहुल रोकडे, आरोग्य अधिकारी डॉ. रागिणी पवार , सर्व विभागाचे अधिकारी, महसूल, आरोग्य, पोलिस कर्मचारी यांनी अतिशय सतर्कपणे काम केले. 

पलूस- कडेगाव विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधी आणि राज्याचे कृषी व सहकार राज्य मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी वेळोवेळी प्रशासनासोबत बैठका घेतल्या. गावांना भेटी देऊन नागरिकांना दिलासा दिला.पलूस तालुक्‍यात कोरोनाचे पुन्हा रुग्ण सापडणार नाहीत. असे वाटत असतानाच पलूस तालुक्‍यातील एका राजकीय नेत्यास कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

तेव्हा मात्र, प्रशासनासह सर्वांचे धाबे दणाणले. कारण हे राजकीय नेते नेहमी लोकांच्या मध्ये, समाजात मिळून मिसळून वागणारे नेते आहेत. त्यांचा संपर्क अधिक लोकांशी येणार. हे माहिती होते.झाले तसेच त्यांचे कुटुंबासह ईतर नागरिकांचे अहवाल पॉंझिटिव्ह आले. 

दुधोंडी, पुणदी, ब्रम्हनाळ, आमणापूर येथील नागरिकांचे अहवाल पॉंझिटिव्ह आले. दुधोंडी शंभर टक्के लॉंकडाऊन करण्यात आले आहे. पलूस, नागठाणे येथेही कोरोनाचे स्थानिक रुग्ण सापडले आहेत. एकूण रुग्णांची संख्या 47 वर जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. 

70 पेक्षा जास्त स्वॅंब टेस्ट बाकी 
पलूस तालुक्‍यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अजूनही 70 पेक्षा जास्त स्वॅंब टेस्टचे अहवाल बाकी आहेत. सदर अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Palus taluka on high alert