Video : कोरोना भाग जा, भारत में थारो कैन काम काम रे; महिलांच्या गाण्याचा व्हिडिओ व्हायरल

Video : कोरोना भाग जा, भारत में थारो कैन काम काम रे; महिलांच्या गाण्याचा व्हिडिओ व्हायरल

सातारा : कोरोना भाग जा, भारत में थारो कैन काम काम रे, कोरोना भाग जा, महिलांच्या एका गटाने गाणे गात कोरोना व्हायरसला देशातून परत जाण्याचे आवाहन केले गेले आहे. संबंधित महिलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ सुमार चार मिनिटांपेक्षा जादा असून अनेक लोक त्यास शेअर करीत आहेत. विशेष म्हणजे पारंपारिक भजन शैलीत महिलांनी असामान्य गाणे गाताना दिसत आहे.
 
सुमारे चार मिनिटापेक्षा जास्त लांबीच्या व्हिडिओमध्ये महिला त्यांच्या मोबाईलमधील गीत वाचत असताना एकत्रितपणे गाता आहेत. सुमारे 23 हजारहून अधिक लोकांनी शेअर्स केलेल्या हा व्हिडिओ सुमारे 1.2 दशलक्षपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. अद्यापही अनेक लोक तो पाहत आहेत. या पोस्टमुळे सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही लोकांनी उलट सुलट, विनोदी अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील आहेत. तर काहींनी प्रश्न विचारले, तर काहींनी निंदनीय उत्तर दिले. यामध्ये एकाने "कोणीतरी गीत समजावून सांगले का ? असे ज्यांनी व्हिडिओ पोस्ट केला आहे त्यांना प्रश्‍न केला आहे. दूसरा एक जण कोरोना व्हायरस : पृथ्वी सोडण्याची वेळ आली आहे असे विनोद म्हणत आहे. 

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. चीनमध्ये अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांची संख्या 3 हजारांपेक्षा अधिक झाली आहे. त्यानंतर आता या व्हायरसमुळे भारतात पहिला बळी गेला आहे. कर्नाटकातील कलबुर्गी येथे 76 वर्षीय संशयित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 

हेही वाचा : CoronaVirus : जग कसे बदलेल सांगणारा टिकटाॅक व्हिडिओ

जरुर वाचा : कोरोनाची भीती : पैठणच्या नाथषष्ठी यात्रेबाबत मोठा निर्णय...

नक्की वाचा : VIDEO : कोरोना गो... गो कोरोना... रामदास आठवलेंचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल

हेही वाचा : अवघ्या ५ मिनिटात घरच्याघरी असं बनवा हॅन्ड सॅनिटायझर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com