
पंढरपूर : पंढरीचा वास.. चंद्रभागे स्नान.. आणिक दर्शन विठोबाचें या संत नामदेवांच्या अभंगानुसार श्री विठ्ठल दर्शनासाठी पंढरीत दाखल झालेले भाविक सर्वप्रथम चंद्रभागा नदी स्नान करण्यास प्राधान्य देतात. मात्र बहुतांश वेळेला भाविकांना नदीतील अस्वच्छ पाण्यातच आंघोळ करावी लागते. भाविकांना नदी स्नानासाठी कायमस्वरूपी स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पंढरपूर नगरपालिकेने पुढाकार घेत चंद्रभागा नदीपात्रातील जलशुद्धीकरणाचा अभिनव प्रकल्प हाती घेतला आहे.