esakal | गणेशोत्सव2019 : विठुमाऊलीला कण्हेरीच्या फुलांची आरास
sakal

बोलून बातमी शोधा

Vithu-Mauli@Pandharpur

कर्नाटकातील बंगळुरुहून खास कन्हेरीचे सुमारे 100 किलो फुले सजावटीसाठी मागविण्यात आली होती.

गणेशोत्सव2019 : विठुमाऊलीला कण्हेरीच्या फुलांची आरास

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गणेशोत्सव : पंढरपूर : श्री गणेश चतुर्थीचे औचित्य साधून विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात कन्हेरीच्या गुलाबी रंगाच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. गुलाबी फुलांच्या रंगामध्ये सजलेले विठुमाऊलीचे रुप अधिकच खुलून दिसत होते. विविध उत्सव आणि पारंपरिक सणांच्या निमित्ताने विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्यावतीने मंदिरात विविध फुलांची आणि फळांची आरास केली जाते. आजही गणेश चतुर्थीनिमित्त कन्हेरी फुलांची मनमोहक अशी आरास मंदिरात करण्यात आली होती. 

सध्या कन्हेरीची फुले दुर्मिळ झाली आहेत. त्यामुळे कर्नाटकातील बंगळुरुहून खास कन्हेरीचे सुमारे 100 किलो फुले सजावटीसाठी मागविण्यात आली होती. आज सकाळी फुलांच्या माळांनी विठ्ठलाचा गाभारा आणि प्रवेशद्वार सजविण्यात आले, तर रुक्‍मिणीमातेची मेघडंबरीदेखील फुलांनी सजवली होती.

विठ्ठलाचे सावळे रुप पाहण्यासाठी सकाळपासूनच मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर सकाळी 10 वाजता विठ्ठल मंदिराच्या सभामंडपात मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते गणेशाची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. गणेशोत्सवानिमित्ताने मंदिर समितीने दहा दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. 

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने कन्हेरी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. यासाठी बंगळुरु येथून 300 रुपये किलो दराने 100 किलो कन्हेरीची फुले मागवण्यात आली होती. आज कन्हेरीच्या फुलांचे महात्म्य असल्याने या फुलांचा सजावटीसाठी वापर केली आहे. 
- सचिन ढोले, कार्यकारी अधिकारी विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समिती, पंढरपूर

loading image
go to top